*पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या प्रयत्नांना यश
वर्धा,
गुन्हेगारांकडून सतत होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर, दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल व तंत्रज्ञानाचे परीक्षण जलद गतीने व्हावे यासाठी वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुसज्ज निवासी प्रशिक्षण केंद्रासह मोबाईल प्रकारणासाठी स्पेशल एसलेंस सेंटर निर्माण करण्यात यावे अशी मागणी Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. अखेर, मंत्रिमंडळ बैठकीत त्या मागणीवर अंतिम मोहर लावण्यात आली आहे.
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील दारूबंदी संदर्भात वस्तुस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे मांडली होती. मागील दहा वर्षांत दारूबंदीचे ९३ हजार ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ५१ हजार ३४० गुन्हयांचा निकाला लागला असून ६७४ प्रकरणात गुन्हा सिद्धी झाली तसेच ५० हजार ६६६ गुन्हे निर्दोष सुटले आहे. दहा वर्षात केवळ १.३१ टक्के दोषसिद्धी झाली आहे. पोलिस कारवाई दरम्यान जब्त केलेल्या मालाचा रासायनिक अहवाल महत्त्वाचा असतो. या अहवालावर दोषसिद्धी अवलंबून असते. गुन्हेंगारांकडून गुन्हा करताना आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. दारूबंदी व अन्य गुन्ह्यातंर्गत जप्त केलेले नमूने व साहित्य तसेच तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी उपसंचालक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूचे सहकार्य घेतले जाते. मात्र प्रयोगशाळेत वर्धा जिल्ह्यासह नागपूर, शहर व ग्रामीण, भंडारा व गोंदिया येथील नमुने देखील परिक्षणासाठी येतात. चार जिल्ह्यांची तपासणीची जबाबदारी असल्याने अहवालास विलंब होतो. दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा, निवासी प्रशिक्षण केंद्रासह मोबाईल प्रकारणासाठी स्पेशल एसलेंस सेंटरची बाब पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यालक्षात आणून दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची दखल घेतली. वर्धा येथे लघु न्याय वैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा, निवासी प्रशिक्षण केंद्रासह मोबाईल प्रकारनासाठी स्पेशल एसलेंस सेंटर मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुचित्रा पवार यांचे आभार मानले.
प्रयोगशाळेत ६७ अधिकारी व कर्मचारी राहणार
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar वर्धा येथे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेसाठी ६७ अधिकारी व कर्मचार्यांची नियुती केली जाणार आहे. यामध्ये उपसंचालक, सहायक संचालक दोन, सहायक संचालक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) दोन, सहायक रासायनिक विश्लेषक सहा, वैज्ञानिक अधिकारी आठ, वैज्ञानिक सहारय्यक नऊ, वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) दहा, अधीक्षक एक, सहायक अधीक्षक दोन, वरिष्ठ लिपीक चार, कनिष्ठ लिपीक दोन, वरिष्ठ लिपीक भंडार एक, वाहन चालक एक, प्रयोगशाळा परिचर बारा, सफाई कामगार तीन, शिपाई दोन व पहारेकरी तीन असे ६७ पदे राहणार आहे.
प्रयोगशाळा पोलिस क्वार्टरमध्ये सुरू
आर्वी मार्गा वरील पोलिस क्वार्टरमध्ये सध्या सुरू होणार प्रयोगशाळा लघु न्यायवैधक वैधानिक प्रयोगशाळा व सुसज्ज निवासी प्रशिक्षण केंद्रासह मोबाईल प्रकारणासाठी स्पेशल एसलेंस सेंटरसाठी ५ एकर जागा लागणार आहे. जागा मिळेपर्यंत हे केंद्र आर्वी मार्गावरिल पोलिस क्वार्टर परिसरातील जुन्या पोलिस यटिंगच्या हॉलमध्ये सुरू करण्याचे प्रावधान करण्यात येणार आहे.