मारेगाव तालुक्यात गारपिटीसह वादळी तडाखा

23 Feb 2026 21:52:24
गहू, हरभरा झोपला : कपाशी, तुरीचेही नुकसान

मारेगाव, 
Heavy rain in Maregaon taluka मारेगाव तालुक्यात वादळ, वार्‍यासह गारपीटीने नागरिकाना झोडपले. दुपारी एकाएकी सुरू झालेल्या या वादळी पावसाने तालुक्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोमवार, २३ फेब‘ुवारीला दुपारी २ ते २.३० च्या सुमारास वातावरणात बदल झाला. आकाशात एकाएकी ढग दाटून आले. मेघगर्जनेसह वादळी वार्‍याला सुरुवात होऊन गारपिटीसह पाऊस पडायला सुरुवात झाली.
 
 
hav
 
Heavy rain in Maregaon taluka  एकाएकी सुरू झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. पिकांचेही मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये असलेला हरभरा आणि गहू पिकाचेही मोठे नुकसान झाले. काढणी सुरू असलेली तूर तसेच शेतामध्ये उभ्या असलेल्या कपाशीचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांचा गहू झोपला आहे. यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या शेतीत उत्पन्नाच्या प्रमाणात मोठी घट झाली ही घट रबी हंगामात भरून काढू या उद्देशाने अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा आणि गहू या पिकांची पेरणी केलेली होती. नुकतीच ही दोन्ही पिके काढणीस आलेली आहेत. यावेळी आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे.
Powered By Sangraha 9.0