इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा धाडसी उपक्रम

23 Feb 2026 19:03:30
पिंपरी
Indrayani River pollution, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले की, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. या निर्णयानुसार, नदीत प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या किंवा औद्योगिक कचरा टाकणाऱ्या कंपन्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.
 

Indrayani River pollution, 
स्वच्छता मोहिमेत महापौर लांडगे स्वतः नदीपात्रात उतरून प्लास्टिक कचरा, औद्योगिक सांडपाणी व इतर घातक घटक काढण्याच्या कामात सहभागी झाले. पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित विभागांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महापालिका, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला आहे.भाजप नेते आणि आमदार महेश लांडगे यांच्या सूचना आणि पाठिंब्यानंतर, चिंचवड येथील डी-मार्ट समोर ३३.८६ एकर जागेवर उभारलेल्या महापालिकेच्या नवीन इमारतीत ८.६५ एकर जागेत हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. महापौर रवि लांडगे यांनी तातडीने संयुक्त पाहणी करून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.स्मारकाच्या निर्णयाबद्दल आमदार महेश लांडगे यांनी महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून, हा निर्णय शहराच्या एकात्मतेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0