महाराष्ट्रात देशातील पहिले ‘एआय’ धोरण लवकरच

23 Feb 2026 12:34:19
पिंपरी,
Uday Samant आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे औद्योगिक क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करून, महाराष्ट्र शासन पुढील तीन ते चार महिन्यांत देशातील पहिले ‘एआय धोरण’ जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित विषयांवर सविस्तर भाष्य केले.
 

Maharashtra AI policy, Uday Samant, 
सामंत यांच्या हस्ते बिजलीनगर येथील एमआयडीसीच्या श्री साईदत्त सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या प्रकल्पात २४ महिन्यांत २६५ घरांची निर्मिती पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
उद्योगमंत्री म्हणाले, Uday Samant  “एआय तंत्रज्ञान विकसित करताना मानवी मेंदूची आणि उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामासाठी माणसांची गरज कायम राहणार आहे. या तंत्रज्ञानाचा रोजगारावर होणारा परिणाम काय असेल, तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत, याचा शासन सध्या अभ्यास करत आहे. तसेच एआयवर आधारित विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमही तयार केले जातील, जे विद्यार्थी आणि कामगारांना भविष्यातील उद्योगांसाठी तयार करतील.”पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि पर्यावरण विभागाने एकत्रितपणे २,५०० कोटी रुपयांचा नदी सुधार आराखडा तयार केला असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे, असेही सामंत यांनी सांगितले. यासोबतच इंद्रायणी आणि पवना नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
भोसरी एमआयडीसीमधील Uday Samant सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (CETP) संदर्भात नागरिकांच्या तक्रारींनंतर नवीन जागेचा शोध सुरू आहे. उदय सामंत यांनी आश्वासन दिले की, महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल.पायाभूत सुविधांच्या कामावरही भर दिला जात आहे. हिंजवडी उड्डाणपुलासाठी ६५० कोटी रुपये मंजूर झाले असून, जागेचा प्रश्न टीआरडीच्या माध्यमातून सुटला आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच एमआयडीसी क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही देण्यात आले असून, पुढील सहा महिन्यांत सर्व अनधिकृत बांधकामे हटवून वाहतूक कोंडी दूर करण्यावर भर दिला जाईल. चाकण परिसरातील रस्ते आणि पूलांची कामे पूर्ण झाल्यानंतर तेथील वाहतूक समस्याही सुटेल, असेही सामंत यांनी सांगितले.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, एआयच्या युगातही मानवी कौशल्ये आणि उद्योगातील अनुभव आवश्यक राहतील, त्यामुळे रोजगार सुरक्षित राहतील आणि तंत्रज्ञानाचा फायदा सर्व स्तरांवर पोहोचेल. स्थानिक प्रशासन, उद्योग व नागरिकांमध्ये संतुलन राखत काम करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे.या पत्रकार परिषदेत सामंत यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजना तसेच विकास धोरणांची माहिती स्थानिक माध्यमांशी शेअर केली.
Powered By Sangraha 9.0