समाजाला एकत्रीत करण्यासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा : तडस

23 Feb 2026 20:15:41
वर्धा, 
समाजाचे हित लक्षात घेऊन जे रंजलेले, गांजलेले, वंचित, दुःखी, कष्टी, दुबळे लोक आहेत. त्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत व्हायला हवी. त्यामुळे समाजसेवेला गती येते व ती समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरते, असे मत माजी MP Ramdas Tadas खासदार रामदास तडस यांनी व्यत केले. वर्धा येथे संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगरच्या वतीने तेली समाज उप-वधू-वर व पालक परिचय मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या हस्ते झाले.
 
 
tadas
 
MP Ramdas Tadas  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेखर शेंडे, कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, शिवसेना नेते रविकांत बालपांडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रवीण हिवरे, सतीश हरणे, कमलेश आकरे, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र झाडे, धनश्याम घंगारे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ऋणानुबंध-२०२६ वधुवर परिचय पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक शैलेंद्र झाडे यांनी केले. संचालन विद्या नरड यांनी तर आभार जगन्नाथ लाकडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी हरीष हांडे, अतुल पिसे, नितीन साटोणे, सुरेंद्र खोंड, पुष्पा डायगव्हाने, किशोर गुजरकर, जगन्नाथ लाकडे, चंद्रकांत चामटकर, विनायक तेलरांधे, शोभा तडस, सुधीर चाफले, सचिन सुरकार, प्रशांत बुरले, सुनिल शिंदे, मनीष तेलरांधे, संजय आष्टनकर, सुनिल ढवळे, भाष्कर भांगे, रमेश जांभुळकर, सुभाष महाकाळकर, प्रमोद खोडे, विपीन पिसे यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0