ट्युशन क्लासेसच्या संचालकासह दाेघांना अटक

23 Feb 2026 12:02:05
अनिल कांबळे
नागपूर, 
Nagpur 12th question paper leak case 
सदरमधील सेंट उर्सूला परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेदरम्यान दाेन विद्यार्थिनींकडे माेबाईल आढळून आल्यानंतर राज्यातील पहिले पेपर फुटीचे प्रकरण समाेर आले. या प्रकरणात एका ट्युशन क्लासेसच्या संचालकासह दाेघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चार दिवस पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निशिकांत मून (वय 45, रा. मानकापूर) आणि फरहान अख्तर (वय 20, रा. कामगारनगर) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. आराेपी निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेसचा संचालक असून त्याच्याकडे फरहान हा शिक्षक म्हणून काम करताे. निशिकांत मून याने शिक्षण विभागातील काहींना हाताशी धरुन बारावीचे पेपर लिक केल्याची शक्यता आहे. तसेच शिक्षक फरहान याने व्हाॅट्सअपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे साेडवलेली आहेत.
 
 paper leak case
 
 
दाेघांचेही माेबाईल जप्त करण्यात आले असून त्यांनी माेबाईलचा डाटा सर्व डिलिट केला आहे. त्यामुळे फॉरेंन्सिक लॅबमधून तपास केल्यानंतर पेपर लिक बाबत ठाेस माहिती पाेलिसांच्या हाती लागणार आहे. दाेघांनाही नागपुरातून अटक केली असून निशिकांत हा त्या ग्रूपचा अ‍ॅडमिन आहे तर फरहानने प्रश्नांची उत्तरे साेडवून मुलांसाठी उपलब्ध केली हाेती. पाेलिस काेठडीत दाेघांनाचीही कसून चाैकशी करण्यात येणार आहे. त्यानंतरच या पेपर फुटीच्या प्रकरणात आणखी किती आराेपी आहेत, याचा तपास करण्यात येणार आहे.
गुरुवारी सेंट उर्सूला परीक्षा केंद्रावर बारावीचा केमेस्ट्रीचा पेपर हाेता. एक विद्यार्थिनी प्रसाधनगृहात जात असल्यामुळे पर्यवेक्षकाला संशय आला. महिला शिक्षिकेने तिची झडती घेतली असता स्मार्टफोन आढळून आला. माेबाईलमधील एका व्हाॅट्सअप ग्रूपमध्ये पेपर सुरु हाेण्यापूर्वीच पेपर आणि त्याची उत्तरे येत हाेती. त्यावरुन पेपर तासाभरापूर्वीच फुटल्याचा संशय पर्यवेक्षकांना आला. माेबाईलमधील व्हाॅट्सअप ग्रूपवर त्याच परीक्षा केंद्रावर दुसरी विद्यार्थिनीसुद्धा हाेती. त्यामुळे दाेन्ही विद्यार्थिनींकडून माेबाईल काढून घेतले आणि त्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली. पेपर फुटल्याची माहिती परीक्षा केंद्रावरील सर्व शिक्षकांपर्यंत पाेहचली. कुजबुज सुरु असतानाच परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी नियुक्त असलेल्या पाेलिस कर्मचाèयांलाही कुणकुण लागली. त्याने लगेच आपले वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अमाेल देशमुख यांना माहिती दिली. पीआय देशमुख ताफफ्यासह परीक्षा केंद्रावर पाेहचले. त्यांनी माेबाईल तपासला असता त्यात 15 जणांच्या व्हाॅट्सअप ग्रूपवर प्रश्नपत्रिका आणि उत्तरे असल्याचे दिसले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र, सेंट उर्सूला शाळेतील शिक्षकांनी शाळेची बदनामी आणि विद्यार्थिनींच्या भविष्याचा विचार करता गुन्हा दाखल हाेऊ नये म्हणून प्रयत्न केले. मात्र, पीआय देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांंनी परीक्षा बाेर्डाच्या अध्यक्षांना माहिती देऊन पडताळणी करुन घेतली. त्यानंतर थेट गुन्हा दाखल केला.
 
 
काेट्यवधीचे घबाड निघेल बाहेर
नागपूर विभागात 1 लाख 60 हजार 292 विद्यार्थी बारावीची परीक्षात देत आहेत. तर फक्त नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील एकून 65 हजार 499 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. पेपर फुटीच्या प्रकरणात एका ट्युशन क्लासेसचा संचालक निशिकांतसह अन्य संचालकांचा समावेश आहे. त्यामुळे या घाेटाळ्यात हजाराे विद्यार्थ्यांचा समावेश असून एका पेपरचे प्रतिविद्यार्थी 25 हजार रुपयांप्रमाणे घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पाेलिसांच्या तपासात काेट्यवधीचे घबाड बाहेर निघण्याची शक्यता आहे.
 
पाेलिसांनी दाखवले साैजन्य
पेपर फुटल्याचे प्रकरण समाेर येताच सदर पाेलिस ठाण्याचे प्रमुख अमाेल देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य आणि साैजन्य दाखवले. परीक्षा केंद्रावर बारावीचे अल्पवयीन विद्यार्थी असल्यामुळे तसेच वर्दीवरील पाेलिस कर्मचारी दिसताच मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेऊ शकते, ही बाब लक्षात घेतली. स्वतःसह पाेलिस कर्मचारी वर्दीत दाखल न हाेता साध्या कपड्यात पाेहचले.
 
 
परीक्षा केंद्रावरही कारवाईची शक्यता
पेपर फुटीचे राज्यातील पहिले प्रकरण नागपुरातील सेंट उर्सूला शाळेच्या परीक्षा केंद्रावर उघडकीस आले. या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांकडे चक्क स्मार्ट फोन हाेते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी थेट परीक्षा हाॅलमध्ये माेबाईल कसे आणले, याचाही तपास करण्यात येणार आहे. या प्रकरणात परीक्षा केंद्रावरील कुणाचा समावेश असल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सदर पाेलिसांनी दिली.
 
 
 
  
Powered By Sangraha 9.0