काठमांडू,
nepal bus accident नेपाळच्या राजधानीपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर एक मोठा बस अपघात झाला. सोमवारी सकाळी नेपाळच्या धाडिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ एक प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळल्याने किमान १८ जणांचा मृत्यू झाला आणि २६ जण जखमी झाले. पोखराहून काठमांडूला जाणारी बस पहाटे १:३० वाजता काठमांडूच्या पश्चिमेला सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या पृथ्वी महामार्गावर त्रिशुली नदीत कोसळल्याने हा अपघात झाला.
नेपाळ सशस्त्र पोलिस दलाचे प्रवक्ते बिष्णु प्रसाद भट्टा यांनी सांगितले की, अपघातस्थळावरून १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि बसमधून २८ जखमी प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिसांचे कर्मचारी बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये न्यूझीलंडचा एक पुरुष प्रवाशाचा समावेश आहे.nepal bus accident जखमींमध्ये एक जपानी आणि एक डच महिला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी, पोलिसांनी सांगितले की अतिवेगामुळे अपघात झाला असावा.