उमरी येथे कत्तलीसाठी बांधलेले ६ बैल जप्त

23 Feb 2026 19:43:30
१.८० लाखांचा मुद्देमाल ताब्यात
पांढरकवडा पोलिसांची कारवाई

पांढरकवडा, 
गोपनीय माहितीच्या आधारे Pandharkawada police raided Umri पांढरकवडा पोलिसांनी उमरी येथे छापा टाकत कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेले ६ गौवंशीय बैल जप्त केले. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
bal
 
शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशिर पोलिस पथकासह मोहदा येथे मंदिर चोरीच्या तपासासाठी जात असताना त्यांना उमरीलगत एका पडित शेतात गौवंशीय बैल कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता ६ बैल अत्यंत अमानुष पद्धतीने एकमेकांच्या पायाला बांधून तसेच गळ्याला आखूड दोरीने पळसाच्या झाडाला बांधलेले आढळले. त्यांना कोणतेही चारापाणी न देता कोंडून ठेवण्यात आले होते.
 
 
Pandharkawada police raided Umri  यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सरफराज शेख रसुल कुरेशी (वय ५८, उमरी) असे सांगितले. संबंधित बैल हे स्वतःच्या मालकीचे असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी पंचनामा अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ६ गोवंशीय बैल ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा २०१५) तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम कलम ११ अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल, पांढरकवडा ठाणेदार तावरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध उपनिरीक्षक नितीन सुशिर, प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, संदीप मडावी, सुनील राठोड व राजू मुत्यालवार यांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0