पेपर फुटी प्रकरण : आतापर्यंत चाैघांना अटक
अनिल कांबळे
नागपूर,
सदरमधील सेंट उर्सूला शाळेतील परीक्षा केंद्रावर बारावीचा Paper leak case पेपर फुटल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली हाेता. या पेपर फुटीच्या प्रकरणात आज साेमवारी आणखी दाेन ट्युशन क्लासेसच्या संचालकांना अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चाैघांना अटक करण्यात आली आहे. मुस्ता खान (42, भानखेडा) व जुनेद माेहम्मद अब्दुल जावेद (42, हसनबाग) अशी आराेपी संचालकांची नावे आहेत.
Paper leak case पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ता खान व जुनेद माेहम्मद अब्दुल जावेद यांचे एक्सेलेन्ट अकॅडमी नावाने ट्युशन क्लास आहे. या क्लासमध्ये बारावीचे शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेतात. या दाेघांनी टेक वन नावाने व्हाॅट्सअप ग्रूप तयार केला हाेता. या ग्रूपमध्ये बारावीच्या केमेस्ट्री आणि िफजिक्स या विषयाच्या प्रश्नपत्रिका पाेस्ट करण्यात आल्या हाेत्या. तसेच त्यावर प्रश्नांची साेडवलेली उत्तरेसुद्धा पाेस्ट करण्यात आली हाेती. त्यामुळे मुस्ता आणि जुनेद यांनी काेचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करुन ताे पेपर फोडल्याची चर्चा आहे. यापूर्वी, एका काेचिंग क्लासचा संचालक निशिकांत मूल आणि फरहान अख्तर या दाेघांना सदर पाेलिसांनी अटक केली हाेती. त्यांनी ‘एक्सआयआय’ (राेमन अंकात 12) नावाने व्हाॅट्सअप ग्रूपवर केमेस्ट्रीचा पेपर टाकला हाेता. त्याच ग्रूपमधील मेंबर असलेल्या एका विद्यार्थिनीकडून परीक्षा केंद्रावर माेबाईल जप्त केला हाेता. त्या माेबाईलमधून पेपर फुटीचे बींग फुटले हाेते. मुस्ताक खान आणि जुनेद जावेद या दाेघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. तर निशिकांत मूल याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
विद्यार्थी असल्याने मिळाला जामीन
Paper leak case पेपर फोडल्याप्रकरणात बारावीचा विद्यार्थी फरहान (19) याला सदर पाेलिसांनी अटक केेली हाेती. त्याला आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले हाेते. ‘फरहान हा स्वतः बारावीचा विद्यार्थी आहे. त्याने फक्त प्रश्नांची उत्तरे साेडवली. त्याचा गुन्ह्याशी प्रत्यक्षपणे समावेश नाही, तसेच त्याचा येत्या 25 फेब्रुवारीला पेपरसुद्धा आहे. अशी बाजू अॅड. गुरुप्रीतसिंह चंडाेक आणि अॅड. राजेंद्र शाहू यांनी मांडली. त्यामुळे न्यायालयाने फरहानला जामीन मंजूर केला.
आणखी काेचिंग क्लासेसचे संचालक रडारवर
काेचिंग क्लासेसच्या संचालकांनी आपल्याकडे शिकणाèया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रति पेपर 25 हजार रुपये घेऊन पेपर फोडला. आतापर्यंत काेचिंग क्लासेसचे तीन संचालक अडकले आहेत. पाेलिसांच्या रडारवर आता अन्य काेचिंग क्लासेसचे संचालक रडारवर आहेत. पेपर फुटीच्या प्रकरणामुळे अनेक काेचिंग क्लासेसच्या संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रश्नचिन्ह
ज्या विद्यार्थ्यांचा Paper leak case पेपर फुटीप्रकरणात समावेश आहे किंवा काेचिंग क्लासेसच्या वाॅट्सअप ग्रूपमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करुन मेरिटला येण्यासाठी प्रयत्न केला, अशा विद्यार्थ्यांचा निकाल राेकण्यात येणार असल्याची माहिती समाेर येत आहे.