काँग्रेस पदाधिकार्‍यांचे साखळी उपोषण

23 Feb 2026 19:37:16
निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराविरुद्ध पुसद काँग्रेस

यवतमाळ 
Public Works Department Pusad सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद अंतर्गत विकास कामांसाठी निविदा प्रकाशित केल्या जात आहेत. स्थानिक आमदार तथा मंत्र्यांच्या आशीर्वादाने निविदा प्रकि‘येत अनागोंदी सुरू आहे, असा आरोप करून पुसद तालुका काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या प्रकरणी काँग्रेसने सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरवात केली असून आंदोलन अधिक तीव‘ करण्याचा इशारा दिला.
 
 
nivida
 
मर्जीतील कंत्राटदाराला काम देता येईल यासाठी चार-चार, पाच-पाच महिने निविदा न उघडणे, कंत्राटदारांना निविदा सादर करण्यापासून रोखणे, कंत्राटदारांना धमक्या देणे, निविदा सादर करणार्‍या कंत्राटदाराकडून वारंवार कागदपत्राची मागणी करणे आणि दुसरे कागद सादर करू नका, असा दबाव आणणे हे सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागात चालू आहेत. या प्रकारामुळे साबां विभागात प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे. त्यामुळे कामाचा दर्जा राहिलेला नाही. मागील वर्षभरात कंत्राटदारांकडून कामे झालेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत हे उघड डोळ्यांनी दिसत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
 
 
 
Public Works Department Pusad  शासकीय विश्रामगृह पुसदच्या नवीन बांधकामाकरिता सुमारे ६ महिन्यांपूर्वी निविदा प्रकाशित झाली होती. मात्र ती अजूनही उघडण्यात आलेली नाही. ही निविदा उघडण्याबाबत २७ २०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतु ही निविदा उघडण्याबाबत २० फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही झालेली नाही. या अनागोंदी कारभारामुळे पुसद तालुका व शहर काँग्रेसतर्फे सोमवार, २३ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सुरू झाल्यामुळे निविदा उघडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र निविदा उघडणे हा प्रश्न आज राहिलेला नाही. उघडण्याकरिता कुठलेही तांत्रिक कारण नसताना चार पाच महिन्यांचा कालावधी लावल्या गेला. या दिरंगाईसाठी जबाबदार कर्मचारी व अधिकार्‍यांवर त्वरित कार्यवाही व्हावी, यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. संबंधितांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, अन्यथा तीव‘ आंदोलन करण्यात येईल आणि होणार्‍या परिणामास सबंधित अधिकारी जवाबदार राहील, असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आहे.
Powered By Sangraha 9.0