अधिवेशनाआधी शिंदेंचा धक्कादायक निर्णय!

23 Feb 2026 11:51:23

Shinde
 
 
मुंबई,
Shinde's shocking decision राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून येत्या सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशनाच्या प्रारंभीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षित निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अधिवेशनाच्या कालावधीत त्यांच्या अखत्यारीतील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती त्यांनी विधानसभाध्यक्षांना पत्राद्वारे कळविली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा दादा भुसे यांच्याकडे देण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभुराज देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली असून नगरविकास खात्याची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे राहणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत चर्चेला वेग आला आहे.
Powered By Sangraha 9.0