गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात ’साऊंड गार्डन’

23 Feb 2026 15:21:21
नागपूर,
gorewada zoo बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला राज्य सरकारने ’साऊंड गार्डन’ आणि स्वतंत्र ’किड्स प्ले एरिया’ उभारण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १.९८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रस्तावित ’साऊंड गार्डन’ व ’किड्स प्ले एरिया’मुळे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होणार आहे. विशेषतः मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन सुविधा उपलब्ध होणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
 

gorewada 
 
  
महसूल वन विभागाची मान्यता
मुख्यत: वनविकास महामंडळाच्या गोरेवाडा झू लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर ही कार्यवाही करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने ही मान्यता दिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिलेल्या तांत्रिक सहमतीच्या आधारे ही मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी केवळ प्रशासकीय स्वरूपाची आर्थिक मंजुरी अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक सर्व मान्यता घेणे बंधनकारक असेल.
अटी व शर्तीचे पालन करण्याचे बंधन
हा प्रकल्प उभारताना काही अटी व शर्तीचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. त्यात नागरी व विद्युत कामे सुरू करण्यापूर्वी वित्त विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तांत्रिक मान्यता घेणे, राबविण्यापूर्वी जमिनीच्या मालकीची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. मंजूर अंदाजपत्रकाच्या मयदितच प्रकल्प करावयाचा आहे.gorewada zoo खरेदी व अंमलबजावणीसाठी
ई-टेंडरिंग प्रक्रियेचे काटेकोर पालन करणे, पर्यावरणीय नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. प्रकल्प राबविताना वन संवर्धन कायद्याचे तसेच न्यायालये आणि वन्यजीव प्राधिकरणांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक राहील. याशिवाय, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची घेणे बंधनकारक असेल.
Powered By Sangraha 9.0