दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचा दावा; या खेळाडूंमुळे भारताचा पराभव

23 Feb 2026 12:08:39
नवी दिल्ली,  
south-africa-captain अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीतील महत्त्वाचा सामना रंगला. या लढतीत यजमान भारताला मोठा धक्का बसला असून दक्षिण आफ्रिकेने प्रभावी कामगिरी करत विजय मिळवला. भारतीय फलंदाजांना अपेक्षित खेळ करता आला नाही आणि संघ केवळ १११ धावांपर्यंत मजल मारू शकला. या पराभवामुळे भारताचे उपांत्य फेरीचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
 
south-africa-captain
 
सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामने आपल्या संघाच्या खेळाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते, मात्र परिस्थितीचा अचूक अंदाज घेत संघाने रणनीतीत बदल केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. स्पर्धेच्या सुरुवातीला गोलंदाजांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती, परंतु या सामन्यात त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. प्रत्येक गोलंदाजाने आपल्या भूमिकेनुसार अचूक टप्प्यावर चेंडू टाकत दबाव कायम राखला, हेच विजयाचे प्रमुख कारण ठरल्याचे त्यांनी नमूद केले. south-africa-captain फलंदाजीबाबत बोलताना त्यांनी डेव्हिड मिलरआणि डेवाल्ड ब्रेव्हिसच यांच्या खेळीचा विशेष उल्लेख केला. या दोघांनी डाव सावरत संघाला स्थैर्य दिले आणि मधल्या षटकांतील शहाणपणाने केलेली धावसंख्या सामन्यातील निर्णायक टप्पा ठरल्याचे ते म्हणाले. खेळपट्टी संथ असल्याने आक्रमकतेपेक्षा धावांची योग्य आखणी आणि मोकळ्या जागांचा शोध यावर भर दिला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
क्षेत्ररक्षणात काही त्रुटी राहिल्या असल्या तरी संघातील समन्वय चांगला असल्याचे मार्करमने सांगितले. south-africa-captain तसेच लुंगी न्गिडी हा संघासाठी महत्त्वाचा बळी घेणारा गोलंदाज असून परिस्थितीनुसार त्याचा प्रभावी वापर करण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता न आल्याने सामना त्यांच्या हातातून निसटला, असे मत व्यक्त करत त्यांनी भारताच्या वरच्या फळीवर पराभवाची जबाबदारी टाकली.
Powered By Sangraha 9.0