‘तरुण भारत नागपूर’चा दिवाळी अंक अव्वल

23 Feb 2026 10:54:22
मुंबई,
Tarun Bharat Nagpur's Diwali issue awards राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘तरुण भारत, नागपूर’च्या दिवाळी अंकाला यंदाचा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर झाला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून पुल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक पुरस्कारासाठी ‘तरुण भारत’ची निवड करण्यात आली आहे.
 
 

save 
संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करताना ‘तरुण भारत, नागपूर’च्या संपादकीय संघाचे अभिनंदन केले. उत्कृष्ट संपादन, दर्जेदार साहित्य, मांडणीतील वैशिष्ट्य आणि वाचकाभिमुख विषयवैविध्य यामुळे या अंकाने परीक्षकांची मने जिंकली. या पुरस्काराचे वितरण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा हा सन्मान मिळाल्याने ‘तरुण भारत, नागपूर’च्या कार्याला नवे बळ मिळाले आहे. साहित्यप्रेमी आणि वाचकवर्गातूनही या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0