VIDEO अवकाळी पावसाची जोरदार हजेरी धानाला दिलासा

23 Feb 2026 11:18:37
गोंदिया,
heavy rainfall in Gondia, जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) पहाटेपासून हवामानात अचानक बदल होत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गोंदियासह गोरेगाव, सडक अर्जुनी, देवरी, सालेकसा आदी तालुक्यांसह जिल्ह्याच्या अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अनपेक्षित पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी भाजीपाला व फळबागांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.
 

 Unseasonal rain, heavy rainfall in Gondia, 
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सोमवारी पहाटेपासून अनेक भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. रब्बी हंगामातील उन्हाळी धान पिकासाठी हा पाऊस पोषक मानला जात आहे. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढून धान पिकाला फायदा होईल, अशी शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे.
 
 
 
मात्र, दुसरीकडे भाजीपाला, heavy rainfall in Gondia कडधान्ये आणि फळबागांसाठी हा पाऊस धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेषतः आंबा बागायतदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. सध्या आंबा पिकाला मोठ्या प्रमाणावर मोहोर आलेला असताना या पावसामुळे अनेक ठिकाणी मोहोर झडल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे. तसेच ढगाळ हवामान कायम राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजीपाल्याच्या पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची भीती असून, शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकूणच, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कुठे दिलासा तर कुठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवस हवामानाची स्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0