वानरचुवा येथे मिळाले हक्काचे मोक्षधाम शेड

23 Feb 2026 20:09:33
समुद्रपूर, 
Vanarachuva : Moksha Dham Shed मृत्यू अटळ आहे. मग तो गरीब असो वा श्रीमंत! मृत्यूनंतर प्रत्येकाचा अंत्यविधी त्याच्या गावातील मोक्षधामावरच केला जातो. मात्र, असे अनेक गावांमध्ये स्मशानभूमी शेड नसल्याने उघड्यावर अंत्यविधी करावा आगतो. मोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वानरचुवा येथे शेड व रस्ता दोन्ही नव्हता. यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्याता उघड्यावर अंत्यविधी करावा लागत होता. आ. समीर कुणावार यांच्या निदर्शनास ही बाब तत्कालीन सरपंच विलास नवघरे यांनी निदर्शनास आणून देताच त्यांनी याकडे गांर्भीयाने लक्ष देऊन याठिकाणी दोन वर्षांआधी शेड साठी ४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून गावाबाहेर अर्ध्या किलोमीटर अंतरावर शेड निर्माण झाले.
 
 
Vanarachuva
 
Vanarachuva : Moksha Dham Shed कुठे शेड आहे, पण रस्ता नाही या रस्त्याच्या अभावी सुद्धा पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. वानरचुवा येथे अंत्यविधी शेडकडे जाणार्‍यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांना अर्ध्या किलोमीटर चिखलातून मार्ग काढावा लागत होता. यामुळे विलास नवघरे यांनी याठिकाणी रस्त्याची मागणी आ. कुणावार यांच्याकडे केली. ही मागणी सुद्धा त्यांना गांभीर्याने घेऊन रस्त्यासाठी ९ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन सरपंच विलास नवघरे यांच्याकडे गावकर्‍यांनी शेड व रस्त्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी असल्याने आ. कुणावार यांच्याकडे पाठपुरावा केला. आ. कुणावार यांनी महत्त्वाची गरज लक्षात घेऊन याठिकाणी शेड व रस्ता यासाठी १३ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. आता येथील नागरिकांना अंत्यविधीसाठी हकाची जागा व रस्ता मिळवून दिल्याने सरपंच विलास नवघरे व वानरचुवा गावातील नागरिकांनी आ. समीर कुणावार यांचे आभार मानले आहे.
Powered By Sangraha 9.0