कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करू : पालकमंत्री डॉ. भोयर

23 Feb 2026 15:39:34
वर्धा,
dr bhoyar श्री संतशिरोमणी गोरोबा काका मातिकला बोर्डला अर्थसंकल्पात ५० कोटीची तरतूद करून लवकरात लवकर मातिकला बोर्डासह अन्य मागण्यांसाठी आपण वैयतिक लक्ष घालून पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कुंभार समाजाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिले. सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या हेरिटेज येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, मेळाव्याचे आयोजक व सकल कुंभार समाज विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते, भगवान सूर्यवंशी, चंदनलाल प्रजापती, सुभाष तेटवार, रमेश बुरबांदे, ओमप्रकाश पांडे, अविनाश ठाकरे, किशोर कल्पे, वसंत जवळेकर, शेषानंद पांडे महाराज, शंकर मोहबिया, गंगाधर खांदारे आदी उपस्थित होते.
 

Dr. भोयर  
 
 
मेळाव्यात समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात येऊन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. शासन दरबारी समाजाच्या मागण्या ठामपणे मांडण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
 
परिषदेत कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी श्री संत गोरोबा काका महाराष्ट्र माती कला बोर्ड तात्काळ कार्यान्वित करून आगामी राज्य अर्थसंकल्पात किमान ५० कोटी रुपयांची तरतूद करावी, ही प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच संत गोरोबा काका यांचे जन्मस्थान तेर (जि. धाराशिव) या तीर्थक्षेत्राचा देहू-आळंदीप्रमाणे विकास आराखडा तयार करून सर्वांगीण विकास करण्यात यावा, कुंभार समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व देण्यात यावे, मातीसाठी आकारली जाणारी रॉयल्टी पूर्णपणे माफ करावी, कुंभार समाजासाठी राखीव असलेल्या खाणीवरील अतिक्रमण हटवावे तसेच मध्यप्रदेश शासनाच्या ९ फेब्रुवारी २०२६ च्या परिपत्रकाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कुंभार व्यावसायिकांना स्वतंत्र कुंभार खाणी उपलब्ध करून द्याव्यात, ग्रापं, नप, मनपा, जिप व पंस क्षेत्रात कुंभार समाजाच्या उत्पादन व विक्रीसाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी, कुशल कारागिरांना राजाश्रय मिळावा तसेच वयोवृद्ध कुंभार कारागिरांना दरमहा ५ हजार रुपये मानधन मंजूर करावे, समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र दोन टक्के आरक्षण देण्यात यावे, कुंभार कला व मूर्तिकला हा विषय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सुरू करून पारंपरिक कलेचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला.
 
यावेळी कुंभार समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे किशोर कल्पे, प्रा. सचिन प्रजापती, राजेंद्र अंबेरे, डॉ. अमित बिश्वास या समाजबांधवांना समाज भूषण, समाज गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.dr bhoyar यशस्वितेकरिता परिषदेचे जिल्हाध्यक्ष वसंत जावळेकर, कृष्णराव बोरसरे, राजेंद्र वझे, रामभाऊ बोरसरे, दिलीप भातकुलकर, लिना सावळीकर, राजू वझे, जयेंद्र चांदुरकर, विनोद काकडे, गिरिजा ठाकरे, कमलेश अवथे, पंकज नानकटे, निलेश वाल्दे, अशोक कपाट, उमेश ठाकूर, रंजना ठाकरे, राजेंद्र गांध्रे आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0