कुस्ती महासंग्राम उत्साहात संपन्न
शिरपूर जैन,
शिरपूर येथे २० फेब्रुवारी रोजी श्री जानगीर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त पार पडलेल्या निकाली कुस्त्यांच्या महासंग्रामात वाशीम तालुयातील वारा येथील Wrestler Prize Distribution पहेलवान विजय शिंदे यांनी दमदार कुस्ती करत पाहिला क्रमांकाचा मान मिळवला. शिरपूर येथे निकाली कुस्त्यांचे दंगल पार पडले. देशभरातून आलेले नामवंत पहेलवान यांच्या दमदार कुस्त्या यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. यावेळी विशेष आकर्षण असलेली नेपाळ विरुद्ध भारत ही कुस्ती देवा थापा नेपाळ व नवीन चव्हाण हिमाचल प्रदेश यांच्यात होऊन सदर कुस्ती देवा थापा यांनी जिंकून ७१ हजाराचे बक्षीस मिळवले. सोबतच महिला कुस्ती पुणे येथील सोनाली मंडलिक यांनी पंढरपूर येथील गर्जे हिला हरवून विजय मिळवला तसेच इतर कुस्त्या मध्ये होंडा शाईन प्रथम बक्षीस असलेली कुस्ती वारा येथील विजय शिंदे या पहेलवानांनी जिंकून पाहिले बक्षीसाचा मान मिळवला.
Wrestler Prize Distribution यावेळी श्री जानगीर महाराज संस्थान येथे ओंकारगीर कुस्तीगीर मंडळ शिरपूर जैन यांनी आयोजित केल्या कुस्ती महासंग्रामात पाहिले बक्षीस होंडा शाईन मोटरसायकल विजय शिंदे वारा यांनी अबुचौस पालम यास चित करून पटकावले. दुसरे बक्षीस स्पेंडर प्लस मोटारसायकल प्रमोद सुळ या पहेलवानाने धनाजी कोळी यास हरवून मिळवली. तिसरे बक्षीस ७१ रुपयाचे रामचंद्र बोंडे मंगळवेढा यांनी संग्राम साळुंके यास चीत करून मिळवले. चौथे बक्षीस ५१ हजार रुपये ख्वाजा परभणी यांनी विरु बनसोड यास हरवून पटकवले. पाचवे बक्षीस ४१ हजार रुपये विक्रम गायकवाड यांनी रविराज सरोदे यास हरवून मिळवले, सहावे बक्षीस ३१ हजार रुपये रवी पहेलवान वाशीम व गोपाल पहेलवान वाशीम यांच्या मध्ये बरोबरी होऊन मिळवले. यावेळी हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
Wrestler Prize Distribution कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बाळू देशमुख, गणेश भालेराव, पंजाब नाईक, राजू कुंडलवाल, गजानन बरांडे, प्रकाश भंगी, रवि देवकर, महेश खंडेलवाल, संतोष पवार यांनी परिश्रम घेतले. या कुस्ती स्पर्धेत ठाणेदार केशव वाघ, एपीआय करुणाशील तायडे, पीएसआय राहुल चव्हाण, पीएसआय इमरान पठाण, पीएसआय धनराज तायडे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.