यवतमाळतील गुन्हेगारी पोलिस महासंचालकाच्या ‘दरबारात’

23 Feb 2026 19:28:20
आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी घेतली भेट

यवतमाळ, 
Yavatmal Crime जिल्ह्याच्या मुख्यालयात मटका, जुगार, भिंगरी तसेच विविध अवैध धंदे सुरू आहेत. यावर स्थानिक पोलिस प्रशासनाकडून पाहिजे तशी कारवाई होत नसल्याने यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन वाढत्या गुन्हेगारीवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली.
 

magkulkar 
 
यवतमाळ जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. यावर स्थानिक पोलिस ठोस कारवाई केल्या जात नाही. परिणामी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. तरी यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केली.
महासंचालक घेणार दखल
Yavatmal Crime  यवतमाळातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलिस महासंचालकांना आमदारांनी दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल यवतमाळातील संबंधित अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील, तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना देण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0