चतरा,
Air ambulance accident in Jharkhand झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील एका विमान अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. रांचीहून दिल्लीकडे चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी निघालेल्या चार्टर विमानात दोन पायलट आणि सहा प्रवासी होते. बचाव पथकाने सर्व मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात झालेल्या विमानाने रांची विमानतळावरून रात्री सात वाजून ११ मिनिटांनी उड्डाण केले होते आणि रात्री अडीच वाजता दिल्ली पोहोचण्याचे नियोजन होते. मात्र उड्डाणानंतर २३ मिनिटांनी विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला आणि ते सिमरिया ब्लॉकजवळ कोसळले. विमानाचे अवशेष सिमरियातील कासारिया गावाजवळील जंगलात सापडले. प्राथमिक तपासात खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
विमानातील पायलट कॅप्टन विवेक विकास भगत आणि सह-वैमानिक कॅप्टन सबराजदीप सिंग, रुग्ण संजय कुमार, रुग्णांचे नातेवाईक अर्चना देवी आणि ध्रुव कुमार, डॉक्टर विकास कुमार गुप्ता आणि परिचारिका सचिन कुमार मिश्रा या सर्वांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी जिल्हा प्रशासन आणि बचाव पथक तैनात असून नागरी विमान वाहतूक विभागही घटनास्थळी आहे. अपघातग्रस्त विमान रेडबर्ड एअरवेजचे बीचक्राफ्ट किंग एअर BE9L होते. अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अपघात तपास आयोग करणार असून ब्लॅक बॉक्स लवकरच सापडेल अशी अपेक्षा आहे.