कोरफडचे पान केसांसाठी वरदान,जाणून घ्या लावण्याची पद्धत

24 Feb 2026 16:30:51
नवी दिल्ली, 
aloe vera leaves आजकाल सर्व लोकांना, महिला असो किंवा पुरुष, आपल्या केसांना चमकदार, मुलायम आणि मजबूत हवे असते. परंतु वातावरणातील बदल, आहारातील पोषक घटकांची कमतरता, पाण्याचा अभाव आणि चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट यांसारख्या अनेक कारणांमुळे केसांना नुकसान होऊ शकते. त्याचा परिणाम केस गळणे, तुटणे, कोंडा होणे आणि केसांच्या मुळांची कमकुवत स्थिती म्हणून दिसतो.
 

कोरफड  
 
तसेच बाजारात उपलब्ध महागड्या केमिकलयुक्त शॅम्पू किंवा हेअर मास्कही नेहमीच केसांसाठी उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक आणि घरगुती उपाय करूनच केसांची नैसर्गिक चमक टिकवणे अधिक प्रभावी ठरते.
यामध्ये कोरफड जेल हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.aloe vera leaves कोरफडचे जाड गर असलेले पान केसांसाठी वरदान ठरते. यात असलेले नैसर्गिक घटक केसांना पोषण देतात, हायड्रेशन टिकवतात आणि केस मुलायम, सॉफ्ट व चमकदार करतात. तसेच यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते.
कोरफड जेल लावण्याची पद्धत:
  • कोरफडचे जाड पान घ्या आणि त्यातील गर काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • तयार झालेली पेस्ट केसांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.
  • १ तास नंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ करा.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोरफड जेल वापरणे लाभदायक ठरते. त्यात लिंबाचा रस आणि खोबऱ्याचे तेल मिसळल्यास टाळूवरील इन्फेक्शन कमी होऊन केस अधिक चमकदार दिसतात.
नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने केसांची गुणवत्ता सुधारते आणि केस नेहमीच सॉफ्ट, मजबूत आणि ताजेतवाने दिसतात. त्यामुळे आता महागड्या प्रॉडक्टवर अवलंबून न राहता, घरच्या घरी कोरफड जेलने केसांना नैसर्गिक चमक आणि पोषण मिळवता येईल
Powered By Sangraha 9.0