अनिल कांबळे
नागपूर,
bhusari murder case अंबाझरीतील कॅेसंचालक अविनाश भुसारी याच्यावर जवळपास 8 ते 10 आराेपींनी गाेळ्या झाडून खून केला हाेता. या हत्याकांडातील दाेन आराेपींना दहा हजारांची आर्थिक मदत करणाऱ्या आणि त्यांचे रेल्वेचे तिकिट बूक करुन देणाऱ्या तरुणीचा थेट हत्याकांडाशी संबंध नसल्यामुळे न्यायालयाने जामीन मंजूर केला. सिमरन लाेखंडे असे जामीन मिळालेल्या तरुणीचे नाव आहे.
नागपूर शहरातील अंबाझरी पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘साेशा’ रेस्टाॅरंटचा संचालक अविनाश भुसारी याची गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती. गॅंगवाॅरमधून हे हत्याकांड घडले हाेते. हिरणवार टाेळीने अविनाश भुसारीची हत्या केल्याचे उघडकीस येताच पाेलिसांनी आराेपींची धरपकड केली हाेती. बंटी हिरणवार याचा भाऊ पवन हिरणवारची 3 जानेवारी 2025 ला हत्या झाली हाेती. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंटीने प्रवेश गुप्ता याचा खून करण्याचा कट रचला. परंतु ऐनवेळी प्लॅन फसल्याने आराेपींनी अविनाश भुसारीची हत्या केली. या प्रकरणात पाेलिसांनी मुख्य आराेपी बंटी हिरणवारसह 22 आराेपींना अटक केली हाेती. यामध्ये शैलेश हिरणवार याची मैत्रिण सिमरन लाेखंडे हिने आराेपींना मदत केल्याचा आराेप हाेता. जेव्हा आराेपी नागपुरातून बाहेरगावी पळून गेले. त्यावेळी नितेश कुमार या मित्राच्या खात्यात सिमरनने आपल्या आईच्या खात्यातून 10 हजार रुपये पाठवले हाेते. तसेच दाेन आराेपींचे रेल्वेचे तिकिट बुकींग केले हाेते.bhusari murder case त्यामुळे सिमरन लाेखंडेलाही आराेपी करण्यात आले हाेते. अॅड. पवन ढेंगे यांनी सिमरन हिची न्यायालयात बाजू मांडली.‘सिमरनचा प्रत्यक्षात हत्याकांडाशी काहीही संबंध नाही. ती गेल्या एप्रिल महिन्यांपासून कारागृहात आहे. आराेपपत्र न्यायालयात दाखल असून सिमरनला जामीन मिळाल्यास तपासावर काेणताही परिणाम पडणार नाही. ही बाजू मान्य करुन न्यायालयाने सिमरनला जामीन मंजूर केला.