शिवाजी चौकात केली निदर्शने
वर्धा,
BJP Andolan दिल्ली येथे सुरू असलेल्या एआय समिटच्या विरोधात काँग्रेसने केलेली आगपाखड आणि आंदोलन हे देशाच्या विकासाला घातक आहे. काँग्रेसच्या देश विरोधी कृत्याचा निषेध म्हणून स्थानिक शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज २४ रोजी आंदोलन करण्यात आले.
आज भारत सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे आर्थिक क्षेत्रातही भारत मोठ्या प्रमाणात आगेकूच करत असताना नवीन तंत्रज्ञान आपले देशात अधिक जोमाने विकसित व्हावी यासाठी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एआय समिटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदेशातील व्यावसायिक उपस्थित असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन काँग्रेसचे नेते व केंद्रातील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याच मार्गदर्शनात केले.
BJP Andolan आंदोलनात माजी खासदार व महाराष्ट्राचे भाजपाचे उपाध्यक्ष रामदास तडस, जिल्हा अध्यक्ष संजय गाते, भाजपा ज्येष्ठ नेते जयंत येरावार, गिरीश कांबळे, जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, जिल्हा कार्यालय मंत्री जीवन सुर्वे, जिल्हा मुख्यालय प्रभारी श्रीधर देशमुख, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, महिला मोर्चा महामंत्री श्रेया देशमुख, वर्षा बोकडे, नीता सूर्यवंशी, रुपाली बढे, मंजू पाल, चित्रा ठाकूर, सह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा महिला मोर्चा पदाधिकारी व जिल्हा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.