भारत दौऱ्यापूर्वी कॅनडाचा मोठा निर्णय; मुंबई हल्ल्याच्या आरोपीवर कारवाईची तयारी

24 Feb 2026 11:18:24
ओटावा,  
mumbai-attack-accused-tahawwur-rana कॅनडा सरकारने २६/११ च्या 2008 मुंबई हल्ला प्रकरणातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याचे कॅनेडियन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या २६ फेब्रुवारीच्या भारत दौऱ्यापूर्वीच हे पाऊल उचलण्यात आल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात भारत-कॅनडा संबंध तणावपूर्ण झाले होते; मात्र कार्नी सरकार संबंध सुधारण्याच्या दिशेने प्रयत्नशील असल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत.
 
mumbai-attack-accused-tahawwur-rana
 
पाकिस्तानात जन्मलेला राणा सध्या भारताच्या ताब्यात असून २००८ मध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने घडवून आणलेल्या मुंबई हल्ल्यांप्रकरणी खटल्याची प्रतीक्षा करत आहे. या भीषण हल्ल्यांत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. कॅनेडियन माध्यमांच्या वृत्तानुसार इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (आयआरसीसी) ने राणाला २००१ मध्ये देण्यात आलेले नागरिकत्व रद्द होऊ शकते, अशी नोटीस पाठवली आहे. ६५ वर्षीय राणा १९९७ मध्ये कॅनडात स्थलांतरित झाला होता. मात्र नागरिकत्व अर्ज करताना त्याने आपल्या वास्तव्यासंदर्भात खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. त्याने ओटावा आणि टोरंटो येथे चार वर्षे वास्तव्य केल्याचा दावा केला होता. परंतु रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (आरसीएमपी) च्या तपासात त्याचा बहुतांश काळ शिकागो येथे गेला असल्याचे समोर आले. mumbai-attack-accused-tahawwur-rana तेथे त्याची घरे व व्यवसाय असल्याचेही उघड झाले. अधिकाऱ्यांनी याला “जाणीवपूर्वक आणि गंभीर फसवणूक” असे संबोधले आहे. योग्य माहिती दिली असती तर नागरिकत्व मिळाले नसते, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
३१ मे २०२४ रोजी आयआरसीसीने पाठवलेल्या पत्रात खोटी माहितीच्या आधारे नागरिकत्व देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण सध्या कॅनडाच्या फेडरल न्यायालयात प्रलंबित असून नागरिकत्व फसव्या मार्गाने मिळवले गेले का, यावर न्यायालय निर्णय देणार आहे. mumbai-attack-accused-tahawwur-rana राणाच्या वकिलांनी सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला आहे. अलीकडे झालेल्या सुनावणीत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही माहिती गोपनीय ठेवण्याची परवानगी मागितली. दरम्यान, १० एप्रिल २०२४ रोजी भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर राणाला औपचारिक अटक केली. लॉस एंजेलिसहून विशेष विमानाने त्याला नवी दिल्ली येथे आणण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0