राष्ट्रपतींच्या दाैऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल

24 Feb 2026 09:24:58
अनिल कांबळे
नागपूर,
president drapedi murmu जामठा येथील ब्रह्मकुमारीज ‘विश्वशांती सराेवर’ येथे बुधवारी राष्ट्रपती द्राेपदी मुर्मू यांच्या नियाेजित दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्धा राेड व परिसरातील जड वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या मार्गाने हाेणारी वाहतूक तात्पूरत्या स्वरुपात वळिवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही अधिसूचना 25 ते 26 फेब्रुवारीदरम्यान अंमलात राहणार आहे.
 

द्रवपदी मुर्मू  
 
 
वाहतूक विभागाचे पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माेटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 115, 116, 117 अन्वये आदेश जारी केला आहे. कार्यक्रमादरम्यान नामपूर-वर्धा व वर्धा-नागपूर मार्गावर गर्दी हाेण्याची शक्यता असल्याने जड वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्राेपदी मुर्मू यांचा विदर्भ दाैरा नियाेजित असून यादरम्यान विविध कार्यक्रमांना त्या उपस्थित राहणार आहेत.president drapedi murmu याशिवाय राष्ट्रपती मुर्मू या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरातही दर्शन घेणार आहे. यावेळी काही वेळासाठी मंदिर सार्वजनिक दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती आहे.
 
असे असतील बदल
- वर्धा मार्गावरून डाेंगरगाव टाेलनाक्याकडून नागपूर, जबलपूर, भंडाराकडे जाणारी जड वाहतूक डाेंगरगाव टाेलवरून वळवून        गुमगावमार्गे समृद्धी झिराे सर्कलकडे पाठविण्यात येईल.
- वर्धा मार्गावरून बुटीबाेरीमार्गे जाणारी जड वाहतूक दाताळा गावमार्गे समृद्धी झिराे सर्कलकडे वळवली जाईल.
- समृद्धी महामार्गावरून अमरावतीकडून नागपूरकडे येणारी वाहतूक समृद्धी झिराे सर्कल-वृंदावन कटिंग येथे थांबविण्यात येईल.
- पांजरा टाेल नाक्याकडून येणारी वाहतूक पांगरी टाेल नाका येथे थांबविण्यात येईल. समृद्धी मार्गाकडे जाणाऱ्यांना मात्र                    आवश्यकतेनुसार साेडण्यात येईल.
- पांजरा टाेल नाक्याकडून वर्धाकडे जाणारी वाहतूक समृद्धी झिराे सर्कल-दाताळा-बुटीबाेरीमार्गे वळिवण्यात येईल.
- नागपूरकडून वर्धाकडे जाणारी वाहतूक नेमलेल्या ठिकाणी परिस्थितीनुसार थांबविणे किंवा वळिवण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0