'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय'; प्रज्वलच्या आत्महत्येचा थरार CCTV मध्ये कैद

24 Feb 2026 12:41:57
नागपूर, 
ambhora-bridge-suicide-case नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंभोरा येथे तरुणाने पुलावरून उडी घेत आत्महत्या केली, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सध्या नदीपात्रात शोधमोहीम सुरू आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असल्याची माहिती मिळाली आहे.
 
ambhora-bridge-suicide-case
 
मृत तरुणाचे नाव प्रज्वल सोम ढेंगे (वय २५) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उडी घेण्यापूर्वी त्याने वडिलांना फोन करून आंभोरा पुलावरून उडी घेत असल्याची माहिती दिली होती. ambhora-bridge-suicide-case ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत अड्याळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन नदीपात्रात शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, पाण्याचा जोरदार प्रवाह आणि अंधारामुळे शोधमोहीमेत अडचणी येत असल्याचे समजते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नैराश्यामुळे तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. या घटनेमुळे आंभोरा परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
सौजन्य : सोशल मीडिया 
Powered By Sangraha 9.0