10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या! नर्समुळे डॉक्टरचा धक्कादायक निर्णय

24 Feb 2026 15:54:13
डोंबिवली,
doctor-attempts-suicide-in-dombivli डोंबिवलीतील एका नामांकित रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की या डॉक्टरने दहा बिअर प्यायल्या आणि तब्बल ४५ झोपेच्या गोळ्या घेतल्या.
 
doctor-attempts-suicide-in-dombivli
 
संबंधित डॉक्टर विवाहित असून त्यांची पत्नी देखील वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर असल्याचे समजते. मात्र, डॉक्टरचा एका नर्ससोबत अवैध संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. या नात्यातून वारंवार लग्नासाठी तगादा लावला जात असल्याने डॉक्टर मानसिक तणावाखाली होते, अशी प्राथमिक माहिती आहे. doctor-attempts-suicide-in-dombivli नैराश्यातूनच त्यांनी दहा बिअर प्यायल्या आणि ४५ झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
घटना समोर आल्यानंतर डॉक्टरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. doctor-attempts-suicide-in-dombivli पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे आणि विष्णू नगर पोलिस ठाण्यात आत्महत्येच्या प्रयत्नासंबंधी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि डोंबिवली परिसरात मोठा गदारोळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.
Powered By Sangraha 9.0