हिंदू सम्मेलनात उसळला जनसागर

24 Feb 2026 19:01:15
शारदा चौक भगवामय; सामाजिक एकतेचा बुलंद नारा

गोंदिया, 
Gondia: 'Hindu Sammelan' गोंदियाच्या शारदा चौकात शनिवार 21 फेब्रुवारी रोजी भगव्या उत्साहाची प्रचंड लाट उसळली. सकल हिंदू समाजातर्फे आयोजित हिंदू सम्मेलनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत हजारोंच्या जनसागराने परिसर दणाणून सोडला. जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि भगव्या पताकांनी सजलेला संपूर्ण परिसर अक्षरशः भगवामय झाला होता. दुपारी फुलचूर नाका येथील शिव मंदिरातून निघालेल्या भव्य कलश यात्रेने वातावरण भारावून गेले. पारंपरिक वाद्यांच्या निनादात, जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी शहर दुमदुमले. शारदा चौकात यात्रा दाखल होताच उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले.
 
 
gn hindi
 
Gondia: 'Hindu Sammelan' यानंतर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि भक्तिगीतांनी वातावरण अधिकच प्रेरणादायी बनवले. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला. सम्मेलनाचे वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांतचे प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी हिंदू समाजाच्या संघटनशक्तीवर भर दिला. सनातन संस्कृतीचे रक्षण, सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिर्माणासाठी एकजुटीची गरज अधोरेखित करत त्यांनी उपस्थितांना जागृतीचा संदेश दिला. कार्यक्रमाला गीता कुटी सत्संग आश्रमाचे स्वामी यशोधनंद सरस्वती महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. संतांच्या मार्गदर्शनाने भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. संध्याकाळी वंदे मातरम आणि भारत माता आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो श्रद्धाळूंनी प्रसादाचा लाभ घेत कार्यक्रम ऐतिहासिक ठरवला.
Powered By Sangraha 9.0