पंचपरिवर्तनाचा स्वीकार करावा

24 Feb 2026 17:31:51
-डॉ. लीना गहाणे यांचे प्रतिपादन

नागपूर, 
रा. स्व. संघाच्या शताब्दी निमित्त्याने सोमलवाडा भागातील जयप्रकाशनगर वस्तीत 'Hindu Sammelan' हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर धापेवाडाचे यशवंत महाराज पराते, रा.से. समितीच्या अ.भा. सह प्रमुख डॉ. लीना गहाणे, ब्रह्मकुमारी अध्यात्म केंद्राच्या सुनीता दिदी, आयोजन समितीचे अध्यक्ष विनय महाजन, पालक दत्ता टेकाडे उपस्थित होते. युवा कीर्तनकार प्रचिती धोंड यांनी इंग्रजांच्या गुलामी राजवटीला राणी लक्ष्मीबाईने दिलेले आव्हान व तिच्या वीरतेचे दर्शन घडविले. तदनंतर मंदार देशपांडे व चमूने ‘जयोस्तुते’ या देशभक्तीपर गीताचे गायन केले.
 
 
hindu
 
प्रसाद फडणवीस प्रास्ताविक केले. यशवंत महाराज यांनी आपल्या आशीर्वचनात 'Hindu Sammelan' ‘हिंदू सर्वानभूती’ ही संकल्पना ठेवून देशाप्रति प्रेम व धर्माप्रति गर्वाची भावना जागृत करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्त्या डॉ. लीना गहाणे म्हणाल्या की, समाजात सत्व जागृत करणे व हिंदूंनी आचरणात पंच परिवर्तनाद्वारे भारत उत्थापनाचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वबोध, प्रबोधन, नागरी कर्तव्याचे पालन या पाच बिंदूंवर दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त भर देण्याचा आग‘ह हिंदू समाजाने करावा. महिलांच्या सुरक्षेवरही त्यांनी भर दिला.
 
 
'Hindu Sammelan'  वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. संमेलनाला पद्मश्री डॉ. विलास डांगरे, डॉ. पंकज चांदे, अनिल दांडेकर, मनपा स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी वखरे यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. परिसरातील च्या वर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. तत्पूवीर्र् जयप्रकाशनगरात हिंदू जागृती स्कूटर रॅली काढण्यात आली. ३५० महिला- पुरुषांनी भाग घेतला. संपूर्ण परिसर भगव्या ध्वजांनी सुशोभित करण्यात आला होता.
Powered By Sangraha 9.0