नात्यांची पायमल्ली; व्हिडिओद्वारे पतीची घोषणा- ‘पत्नी भाड्याने उपलब्ध’

24 Feb 2026 11:45:56
नवी दिल्ली,  
wife-available-for-rent सोशल मीडियावर एका व्हिडिओने प्रचंड खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वतःच्या पत्नीला भाड्याने देण्याचे भाष्य करताना दिसतो. घरखर्च भागवणे कठीण झाल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचा तो दावा करतो. हा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
 
wife-available-for-rent
 
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे, हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही. मात्र आर्थिक अडचणींचा आधार घेत जोडीदाराला एखाद्या वस्तूप्रमाणे वागवणे किंवा त्याचे मानवी अस्तित्व नाकारणे, हे अनेकांना संतापजनक वाटत आहे. wife-available-for-rent विवाह हा परस्पर सन्मान, विश्वास आणि जबाबदारी यांवर उभा असलेला संबंध मानला जातो. आयुष्यभर साथ देण्याच्या वचनांवर उभारलेले हे नाते अशा प्रकारच्या विधानांमुळे प्रश्नांकित होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. काही जणांनी मोठ्या शहरांमध्ये ऐकू येणाऱ्या तथाकथित ‘पत्नी अदलाबदल’सारख्या प्रथांचा उल्लेख करत या घटनेशी तुलना करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय समाजरचनेत विवाहसंस्था पवित्र मानली जाते आणि अशा गोष्टी सर्वसामान्यपणे स्वीकारल्या जात नाहीत, असे मतही व्यक्त झाले. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीचे वक्तव्य अधिकच वादग्रस्त ठरले आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत संबंधित व्यक्तीवर कठोर टीका केली, तर काहींनी उपरोधिक किंवा संतप्त प्रतिक्रिया दिल्या. wife-available-for-rent अनेकांनी पत्नी ही कुठलीही वस्तू नसून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली मानव आहे, याची जाणीव करून दिली. काहींनी तर संबंधित महिलेने स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. या प्रकरणामुळे वैवाहिक नात्यांतील जबाबदारी, सन्मान आणि स्त्रीच्या अधिकारांबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील या घटनेने केवळ एका व्हिडिओपुरता प्रश्न मर्यादित न ठेवता समाजातील मूल्यव्यवस्थेवरच चिंतन करण्याची वेळ आणली आहे.
Powered By Sangraha 9.0