कुंभार समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

24 Feb 2026 19:45:55
विविध मागण्या प्रलंबित
 
वर्धा, 
Kumbhar samaj कुंभार समाज मूर्तिकाम, गाडगे, मडकी व विट बनविण्याचा व्यवसाय करतो. परंतु, माती व इंधनाच्या अनेक समस्या आहेत. यासह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकल कुंभार समाज विकास परिषदेचे अध्यक्ष संजय गाते यांच्या नेतृत्वात मंगळवार २४ रोजी समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
 
 
kumbahar
 
मातीसाठी अनेकदा पटवारी, मंडळ अधिकारी व तहसीलदार कुंभार समाजास त्रास देतात. समाजाच्या मागण्या शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ९ मार्च २०१८ रोजी शासनाने कुंभार समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व आर्थिक उत्कर्षाकरिता श्री संत शिरोमणी गोरोबा काका माती कला बोर्ड स्थापनेची घोषणा केली. परंतु, सात वर्षे लोटूनही बोर्ड कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. कुंभार समाजासाठी श्रीसंत गोरोबा काका महाराष्ट्र माती कला बोर्ड त्वरित कार्यान्वित करावे, येत्या अर्थसंकल्पामध्ये याकरिता ५० कोटींची तरतूद करावी, विधान परिषदेमध्ये कुंभार समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी पूर्णतः माफ करण्यात यावी, कुंभार समाजासाठी राखीव कुंभार खाणीवरील अतिक्रमण दूर करावे, मध्यप्रदेश शासनाच्या धर्तीवर राज्यातील कुंभार व्यावसायिकांना स्वतंत्र कुंभार खानी देण्यात याव्यात, आदी मागण्या समाजबांधवांनी केल्या.
 
 
Kumbhar samaj  निवेदन देतेवेळी सकल कुंभार समाज विकास परिषदेचे अध्यक्ष संजय गांधी, चंदनलाल प्रजापती, सुभाष तेटवार, सुरेश बुरबांदे, ओमप्रकाश पांडे, अविनाश ठाकरे, किशोर कल्पे, अ‍ॅड. आमटे, राकेश प्रजापती, संजय वाडकर, चंद्रकला चिकाने, सचिन इंगळे यांच्यासह कुंभार समाजातील नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0