साक्षिदार विश्वासार्ह नसल्याने हत्याकांडाच्या आराेपातून निर्दाेष मुक्तता

24 Feb 2026 20:45:25
- मुख्तार अली इराणी खून खटला

अनिल कांबळे
नागपूर, 
Mukhtar Ali Irani murder case ‘आराेपी हल्ला करीत असताना अंधाराचा फायदा घेऊन मी लपून बसलाे हाेताे. जखमीला मदत न करता मी थेट त्याच्या घरी जाऊन भावाला माहिती दिली,’ अशी साक्ष देऊन आराेपींनीच खून केल्याचा दावा साक्षिदाराने केला हाेता. मात्र, साक्षिदाराचे वर्तन आणि साक्ष विश्वासार्ह नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला. त्यामुळे काटाेलमधील मुख्तार अली इराणी हत्याकांडातील सहाही आराेपींची न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली. हा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम.धानाेरे यांनी दिला. निहाल मधुकर ढाेके (20 वर्षे), मधुकर दत्तू ढाेके (50) , पप्पू महादेव ढाेके( 35) , गाैरव रुपनाथ ढाेके (30), आशिष प्रभाकर बाेथे (25) आणि रजत उमेश खंते (25) सर्व राहणार काटाेल अशी निर्दाेष मुक्तता झालेल्या आराेपींची नावे आहेत.
 
 
court
 
29 मे 2020 मध्ये मधुकर ढाेके यांच्या मटनाच्या दुकानात मुख्तार अली व त्याच्या साथिदारांनी मधुकर यांचा नाेकर उमेश याच्यावर सत्तूरने हल्ला केला हाेता. त्यामुळे ढाेके कुटुंब दहशतीत आले हाेते. त्याच दिवशी रात्री अकरा वाजता मुक्तार अली आणि त्याचा मित्र हर्षल रक्षित हे दाेघे दुचाकीने हेटी गावच्या पुलावरुन जात हाेते. तेथे अज्ञात आराेपींनी त्यांना अडवले. त्यांच्यावर काठी, राॅड आणि शस्त्रांनी हल्ला केला. यादरम्यान हर्षल हा अंधाराचा ायदा घेऊन पळला आणि अंधारात लपून बसला. गंभीर जखमी अवस्थेत साेडून आराेपींनी पळ काढला. त्यावेळी अंधारात लपून बसलेला हर्षल हा तेथे आला आणि त्याने जखमीला मदत न करता त्याचा भाऊ सबदर अली याला माहिती दिली. सबदर अली हा काही साथिदारांसह घटनास्थळी पाेहचला आणि त्याने जखमी मुक्तारला रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी सबदर अलीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली.
 
 
17 साक्षीदारांची तपासणी
Mukhtar Ali Irani murder case  या घटनेचा एकमेव साक्षिदार हर्षल रक्षित असल्याचे काटाेल पाेलिसांनी दर्शविले. मात्र, अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी त्याच्या साक्षीला विराेध दर्शविला. अंधारात लपून बसणे आणि दूरुन घटना बघणे ही बाब विश्वासार्ह नाही. त्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी ताे सबदर अलीला माहिती देऊन निघून गेला. तसेच मुक्तारचा भाऊ सबदर अली यानेही घटनास्थळी पाेहचल्यानंतर आराेपी हे मुक्तारवर हल्ला करीत असल्याचे सांगितले. त्याचीसुद्धा साक्ष विश्वासार्ह नसल्याचे स्पष्ट झाले. आराेपींना संशयाचा ायदा देत न्यायालयाने निर्दाेष मुक्त केले. या प्रकरणी सरकार पक्षार्ते एपीपी अ‍ॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली तर आराेपींर्ते अ‍ॅड.चंद्रशेखर जलतारे आणि दीपक दीक्षित यांनी बाजू मांडली.
Powered By Sangraha 9.0