अर्जुनी मोर,
स्थानिक नगरपंचायत विषय समिती सभापतीपदाची निवडणूक मंगलवार 24 फेब्रुवारी पार पडली. बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादीचे दानेश साखरे, पाणीपुरवठा सभापतीपदी भाजपचे यशकुमार शहारे तर स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी भाजपच्या सपना उपवंशी यांची वर्णी लागली. उल्लेखनीय म्हणजे ही Municipal elections निवडणूक अविरोध पार पडली. येथील नगरपंचायतमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना युतीची सत्ता आहे. बांधकाम सभापती पदावर राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकाची वर्णी लागल्याने आ. राजकुमार बडोले यांचे सहकार्याने शहर विकासाला अधिक निधी उपलब्ध होऊन विकासाला गती प्राप्त होईल असा विश्वास साखरे यांनी स्वागतप्रसंगी व्यक्त केला.
Municipal elections यावेळी नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, उपाध्यक्ष ललिता टेंभरे, नगरसेवक राधेश्याम भेंडारकार, सर्वेश भूतडा, दिक्षा शहारे, अतुल बन्सोड, ममता भैय्या, दिव्या पशीने, सुषमा दामले, शिला उईके, इंदू लांजेवार, नगरसेवक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय कापगते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी जिप उपाध्यक्ष यशवंत गणवीर, भाजपा महामंत्री लैलेश्वर शिवणकर उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाने, प्रशासकीय अधिकारी दिलीप उईके, सभा लिपिक सुमित मेश्राम यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. नवनिर्वाचित सभापतींचे उपस्थितांनी पुष्पगुछ देत मिठाई भरवून अभिनंदन केले.
आरेकरचे नाराजी नाट्य
राष्ट्रवादीचे सभापती पदासाठी इच्छुक नगरसेवक सागर आरेकर यांचे नाराजी नाट्य पहायला मिळाले. पक्षाने साखरे यांना तिसर्यांदा सभापती बनविले, एकाच व्यक्तीला तीनदा संधी का दिली म्हणून खरेदी विक्री सभागृहातून बाहेर जात निवडणूक प्रक्रियेवेळी गैरहजर राहिले.