पोलिस बनता बनता बनला आरोपी

24 Feb 2026 21:44:04
बाप आणि मुलाचा खुनात सहभाग

कळंब, 
कळंबपासून 15 किमी असलेल्या दोनोडा या गावात एका युवकाचा कुऱ्हाडीने ठेचून खून करण्यात आला. यातील एक आरोपी आशिष करलुके हा तर सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीतील एक उमेदवार असून या Murder case खून प्रकरणात त्याला पोलिसांनी आरोपी केले आहे. मृतक अभिलाष उर्फ दत्ता केशव चौधरी (वय 33, दोनोडा) याचा गावातील आशिष मारुती करलुके याच्यासोबत 2020 मध्ये मोठे भांडण झाले होते. त्यावेळी आशिषवर भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. परंतु सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीत त्यातील जुना आरोपी आशिष करलुके याला परीक्षा द्यायची होती.
 
 
mudksklse
 
पण अभिलाष चौधरी याने पूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे त्याला पोलिस भरतीत अडचण येईल म्हणून आशिषचे वडील मारुती करलुके (वय 55, दोनोडा) याने 23 तारखेला रात्री 8.30 वाजता अभिलाषच्या घरापुढे जाऊन जोरजोराने ओरडत, ‘माझ्या मुलावर दाखल केलेले गुन्हे मागे घे, माझ्या मुलाला पोलिसची भरती परीक्षा द्यायची आहे. त्या गुन्ह्यामुळे माझ्या मुलाला पोलिस भरतीमध्ये अडचण येईल’, असे बोलून भांडण केले आणि परत घरी गेला.
 
 
Murder case  दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवार, 24 फेब्रुवारीला सकाळी सव्वानऊच्या सुमारास आपला मुलगा आशिषला बोलावून मारुती यांनी अभिलाष चौधरी याच्या शरीरावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जागीच ठार केले. या घटनेने दोनोडा गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार राजेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतकाचे वडील केशव चौधरी यांच्या तक्रारीवरून करलुके बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक सागर भारस्कर करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0