अजित दादांसाठी नाना पाटेकर भावूक; ५४ सेकंदांत मंच सोडला, VIDEO

24 Feb 2026 13:37:38
मुंबई, 
patekar-gets-emotional-ajit-pawar महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने महाराष्ट्रातील जनतेत आणि त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या कार्यकर्ते आणि चाहत्यांमध्ये अजूनही हे खरे आहे की दादा आपल्यात नाहीत, असा विश्वास बसत नाही.
 
patekar-gets-emotional-ajit-pawar
 
अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुंबईच्या वरळी डोममध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत पवार कुटुंबातील सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षातील नेते उपस्थित होते. अनेकांनी अजित पवारांच्या आठवणी शेअर केल्या आणि त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. patekar-gets-emotional-ajit-pawar या शोकसभेत नाना पाटेकर देखील उपस्थित होते. आपल्या मित्राला श्रद्धांजली देताना ते भावूक झाले आणि मंचावर बोलताना थोड्या वेळाने मंच सोडावे लागले. नाना पाटेकर म्हणाले, “गेली ५० वर्ष माझा आणि दादाचे संबंध आहेत. दादा कार्यकर्ता होता तेव्हापासून आमची ओळख होती. मी बारामतीला गेलो की दादा माझी प्रत्येक उठबस पाहायचा. आज आपण जर येथे शोकसभा न करता दादांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत असतो, तर आनंद वाटला असता.”
नाना आणि अजित पवार यांची खास मैत्री अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावर दिसली आहे. नानांनी अनेकवेळा अजित पवारांच्या मिश्किल स्वभावाचं कौतुक केलं आणि त्यांच्यावर हलकीफुलकी फिरकी देखील केली होती. patekar-gets-emotional-ajit-pawar अजित पवारांच्या निधनानंतर नानांचा लेक मल्हार पाटेकर यांनी दोघांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामुळे त्यांची घनिष्ट मैत्री पुन्हा प्रकाशात आली. अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. या प्रसंगात त्यांच्या आठवणींनी सभागृह भावूक झाले. नेहमीच स्पष्टवक्तेपणा, कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे अजित पवार यांची हळवी आणि मानवी बाजू सगळ्यांसमोर आली, ज्यामुळे उपस्थितांना अजून भावूक व्हावे लागले.
Powered By Sangraha 9.0