पेपर फुट प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

24 Feb 2026 21:22:08
अनिल कांबळे
 
नागपूर, 
सेंट ऊर्सूला परीक्षा केंद्रावरील बारावीचा paper leak case पेपर फुटल्याप्रकरणाचा सखाेल तपास करण्यासाठी पाेलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. पाेलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी स्थापन केलेली सहा सदस्यीय एसआयटी आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. 18 फेब्रुवारी राेजी सेंट ऊर्सूला उच्च माध्यमिक शाळेत बारावीच्या परीक्षेदरम्यान रसायनशास्त्राचा पेपर सुरू हाेण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका एका विद्यार्थिनीच्या माेबाईलवर आली हाेती. परीक्षेच्या पर्यवेक्षकांनी ही बाब लक्षात घेतल्यानंतर बाेर्ड अधिकाऱ्ऱ्यांनी सदर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. या प्रकरणात तपासादरम्यान पाेलिसांनी मूल अकॅडमीचे संचालक निशिकांत मूल आणि त्यांचा सहकारी फरहान अख्तर (मानकापूर) यांना अटक केली.
 
 
paper
 
paper leak case  त्यानंतर दुसèया दिवशी माेमिनपुरा येथील एक्सलन्स अकॅडमीचे संचालक मुस्ता खान मुनिर खान व त्यांचा कर्मचारी जुनैद माेहम्मद अब्दुल जावेद यांनाही अटक करण्यात आली हाेती. पाेलिसांच्या माहितीनुसार, मुस्ताने‘टेक वन’ या व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपवर रसायनशास्त्राचा पेपर पाेस्ट केला हाेता. त्यानंतर जुनैदने त्याच ग्रुपवर उत्तरे पाेस्ट केल्याचा आराेप आहे. ही प्रश्नपत्रिका पुढे विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. हे प्रकरणाची पाळेमूळे खाेदण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. त्यात एक सहाय्यक पाेलिस निरीक्षक , एक पाेलिस उपनिरीक्षक आणि चार पाेलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. पेपर फुटीचा मूळ स्राेत शाेधणे आणि संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करणे, यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0