वाढदिवसाच्या दिवशीचं अंत! डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकले, आणि...

24 Feb 2026 16:05:54
नसरापूर,
Pune News : नसरापूरच्या कुरंगवडी (ता. भोर) येथील एका शेतात दुर्दैवी घटना घडली. शुभांगी नीलेश राऊत (वय ४१) या महिलेचा डोक्यावरील स्कार्फ आणि केस यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता घडली.
 
 

pune
 
 
शुभांगी राऊत त्या दिवशी कुटुंबासमवेत शेतात वाटाणा-मसूर भरडत होत्या. अचानक त्यांचा डोक्यावरील स्कार्फ यंत्रात अडकला आणि यंत्राने त्यांना ओढले. तातडीने त्यांना नसरापूरच्या खासगी रुग्णालयात नेले गेले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
शुभांगींना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या माजी सैनिक रमेश राऊत यांच्या सूनबाई आणि निवृत्त सैनिक नीलेश राऊत यांच्या पत्नी होत्या. संपूर्ण गावात या दुर्दैवी घटनेमुळे शोककळा पसरली आहे, विशेष म्हणजे हा अपघात त्यांचा वाढदिवसाच्याच दिवशी झाला.
 
राजगड पोलिस ठाण्याच्या माहितीप्रमाणे, नातेवाईकांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार मंगेश कुंभार करत आहेत.
Powered By Sangraha 9.0