रामदास तडस भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष

24 Feb 2026 20:03:01
वर्धा, 
वर्धा लोकसभेत प्रचंड मताधियाने सलग दोन वेळा निवडून आलेले माजी खासदार Ramdas Tadas रामदास तडस यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून काम करताना रामदास तडस सर्वात सहज उपलब्ध होणारे खासदार म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आलेला प्रत्येक गरजू व्यती हसर्‍या चेहर्‍याने परत जात होता. २०२५ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी जनसंपर्क कमी केला नाही. ते तेली समाजाचे प्रदेशाचे नेते आणि कबड्डी संघाचेही नेते आहेत.
 
 
TADAS
 
Ramdas Tadas  महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्यावर उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले. कार्यकर्त्यांच्या बळावर संघटन अधिक सक्षम करून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी सातत्याने कार्य करणे हीच माझी प्राथमिकता राहील, असे मत व्यत केले. खेळ या विषयात त्यांची रूची असल्याने त्यांना एखाद्या मंडळाची जबाबदारी मिळेल अशी चर्चा असताना त्यांना भाजपाने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0