सेलूतील मुख्य रस्त्याने बाजार दिवशी घेतला अखेर मोकळा श्वास

24 Feb 2026 19:55:21
नगरपंचायत प्रशासनाची धडक कारवाई
 
सेलू, 
Selu Nagar Panchayat: Weekly Market गेल्या अनेक वर्षांपासून सेलू शहरातील मुख्य रस्त्यावर आठवडी बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी अखेर फुटली आहे. नगरपंचायत प्रशासनाने आज मंगळवारी केलेल्या नियोजनबद्ध कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, वर्षानुवर्षांची ही समस्या मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यत केले आहे.
 
 
selu
 
आज सकाळी ८ वाजतापासूनच नगरपंचायत प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. मुख्य रस्त्यावर दुकान थाटणार्‍या विक्रेत्यांना आठवडी बाजाराच्या नियोजित जागी स्थलांतरित होण्यासाठी कर्मचार्‍यांमार्फत मदत करण्यात आली. मुख्याधिकारी अनुप अग्रवाल आणि पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
 
 
Selu Nagar Panchayat: Weekly Market  सेलूच्या मुख्य रस्त्यावर आठवडी बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी होत असे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी राहत असल्याने सर्वसामान्य जनतेला चालणेही कठीण झाले होते. या त्रासामुळे शहरातील जनतेची प्रशासनाकडे मोठी ओरड होती. आजच्या धडक मोहिमेमुळे रस्ता पूर्णपणे मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत झाली आहे. विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना योग्य ठिकाणी जागा मिळवून देण्यासाठी कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. यामुळे ग्राहक आणि दुकानदार या दोघांनीही प्रशासनाचे आभार मानले आहेत. या कारवाईच्या वेळी मुख्याधिकारी अनुप अग्रवाल, पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0