मुंबई,
Sonali Kulkarni's brother passes away मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोनालीच्या चुलत भावाचा अनिरुद्ध कुलकर्णीचे निधन झाले आहे. भावाच्या अचानक जाण्याने सोनालीसह तिच्या कुटुंबीयांवरही मोठा शोक कोसळला आहे. भावाच्या निधनानंतर खचलेल्या सोनालीने सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट शेअर करत आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये भावाबद्दल भावनिक शब्दांत लिहिले आहे की, “आमचा अन्नूमा… हे जग सोडून तू एका चांगल्या ठिकाणी गेलास. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तिकडे वेदनारहित नवीन आयुष्य मिळो. तू अध्यात्मिक, निरागस आणि प्रेमळ हृदयाचा व्यक्ती होतास. तुझं प्रत्येकासोबत छान नातं होतं, सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम केलंस. तुला सर्व गाणी माहित होती, तबला छान वाजवायचास आणि तुझ्या हातचा चहा सर्वांना आठवत राहील. तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू. ओम शांती. सोनालीच्या पोस्टवर चाहत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी कमेंट करून तिचं सांत्वन केलं आहे.