प्रगतशील शेतकरी यादव ढवळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

24 Feb 2026 18:32:38
शिरपूर जैन, 
State award : farmer Yadav Dhawale येथील प्रगतशील शेतकरी यादव ढवळे यांना विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी ता. वाई जिल्हा सातारा यांच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी विद्यानिकेतनचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सोबतच पत्रकार कैलास भालेराव, विजय धोंगडे यांचा सुध्दा या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
 
 
farmar
 
State award : farmer Yadav Dhawale  कोचळेवाडी तालुका वाई जिल्हा सातारा येथील विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था या संस्थेला २२ फेब्रुवारी रोजी ७ वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने या संस्थेचे अध्यक्ष शशिकांत एकनाथ कोचळे यांनी विद्यानिकेतन राज्यस्तरीय पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातून पुरस्कारासाठी ३० मान्यवरांची उपस्थिती होती विविध क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांना वाई येथे संस्थेच्या वतीने विद्यानिकेतन राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये शिरपूर जिल्हा वाशीम येथील प्रगतशील शेतकरी यादव ढवळे यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 
 
State award : farmer Yadav Dhawale  नगराध्यक्ष अनिल सावंत, विजय टेकाळे, नितीन वरखडे, संपत सावळे, कुस्तीपटू सत्यजित माने, संतोष शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत कोचळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल जांभळे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0