विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
वर्धा,
Vardha : Bhumi abhilekha vibhag प्रलंबित मागण्यांसाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्यांनी आज मंगळवार २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या पुढाकारात कामबंद आंदोलन पुकारले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते. मात्र, दीडशे दिवसांचा कालावधी लोटूनही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. विभाग व शासन स्तरावरून याबाबत वेळकाढुपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. कर्मचार्यांच्या संविधानिक न्याय हकांवर गदा आणण्याचे व दबावतंत्राचा वापर करून काम सुरू आहे. न्याय मिळत नसल्याने व्यथित होऊन कर्मचार्यांनी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले.
Vardha : Bhumi abhilekha vibhag तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, सुधारित आकृतीबंध (भूकरमापक व परिरक्षण भूकरमापक यांचे वाढीव पदासह), मोजणी कर्मचार्यांना निश्चित प्रवासभत्ता ठरवून तो वेतनामध्ये समाविष्ट करावा, इतर विभागातील अधिकार्यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने त्यांना या विभागात बदली अथवा प्रतिनियुती न देणे, विभागाचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करवा, शेत रस्ते मोजणी व हद्दकायम बाबत शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी, मोजणी ही बाब धोरणात्मक बाब म्हणून अंतर्भूत करण्यात येऊ नये, भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग असल्याने जमाबंदी आयुत आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे हे संवर्ग पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरावे, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनात बजरंग पवार, गणेश महाकाळकर, स्वप्नील धोटे, सचिन सोनटके, सम्राट कांबळे, हरेश किनकर, शेषराव नाईक, ब्रह्मानंद लोंढे यांच्यासह भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी सहभागी होते.