आता ‌‘केरळ‌’चे होणार ‌‘केरलम‌’?

24 Feb 2026 14:57:11
तिरुवनन्तपुरम,
kerala दक्षिण भारतातील राज्य केरळचे नाव बदण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. केरळच्या मंत्रिमंडळासमोर राज्याचे नाव ‌‘केरलम‌’ करण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर सर्व सोपस्कार पार पडले की राज्याचे नाव ‌‘केरलम‌’ करण्यावर शिक्कामोर्तब होईल.
 


kerala 
 
विशेष म्हणजे केरळमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच राज्याचे नाव बदलण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 2024 मध्येच राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसा अर्जही त्यांनी केंद्र सरकारला पाठवला होता.kerala केरळ विधानसभेने अधिकृत रेकॉर्डवरही राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आधीच पारित केला आहे. 25 जून 2024 रोजी विधानसभेने दुसऱ्यांदा राज्याच्या नावासंदर्भातील प्रस्ताव पारित केला होता. हा प्रस्ताव पहिल्यांदा पारित झाल्यानंतर गृहमंत्रालयाने त्याची समीक्षा केली आणि त्यात काही तांत्रिक सुधारणा करण्यास सुचवले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद होता की, मलयालममध्ये केरळला केरलम असे म्हटले जाते.
पंतप्रधानांची भेट घेणार
या विषयाला विधानसभा निवडणुकीपूर्वी निकालात काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे समजते. ही बैठक सेवा तीर्थ येथे होईल. यापूर्वी 13 फेब्रुवारीला केरळच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधानांची साऊथ ब्लॉक येथे भेट घेतली होती.
Powered By Sangraha 9.0