नागपूर,
sudarshan shinde अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे तरुणांसाठी शौर्य, व्यवस्थापन आणि नैतिकता यांचा आदर्श आहेत. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, जे तरुणांना स्वावलंबी आणि राष्ट्रप्रेमी बनण्याची प्रेरणा देते. शिवरायांचे जीवन हे ’स्व’ कडून ’समष्टी’ जाण्याचा आणि संकटांना संधीत बदलण्याचा सर्वात मोठा धडा असल्यामुळे आजच्या युवापिढीने शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन शिव शंभू व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी प्रतिपादन आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने राष्ट्रचिंतन व्याख्यान कार्यक्रमात ते युवकांना मार्गदर्शन करीत होते. शुक्रवारी तलाव परिसरातील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन करारे, रितेश गावंडे, नगरसेविका शिवाणी दाणी, नगरसेवक श्रीकांत आगलावे, विष्णू चांगदे, रितेश रहाटे आदी उपस्थित होते.
शिवाई देवीच्या नावावरुन शिवाजी
आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले, अनेक प्रकारच्या अन्यायाने जनता पिळवटून निघत अशा काळात १९ फेब्रुवारी १६३० रोजी, तो दिवस उगवला ज्या दिवशी हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला.
हा दिवस जगभर शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. जो रयतेचा राजा झाला, जाणता राजा म्हणून उदयास आला. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि नाव जिजाबाई भोसले होते. शिवनेरी गडावरील आई शिवाई देवीच्या नावावरुन त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
जिजाऊंचे स्वप्न पूर्ण वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याच स्वप्न पाहिले आणि तशी घेडदौड सुरु केली. जिजाऊ शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच शूरवीरांच्या गोष्टी सांगत. जिजाऊ त्यांना सांगत, की शिवबा तुझा जन्म सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी नाही, तर गोरगरिबांना, रंजल्या गांजल्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. जिजाऊंचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरणा उभारले.
युवकांनी यातून बोध घ्यावा
दयाशंकर तिवारी म्हणाले, इतिहास साक्षी आहे, असा एकमेव राजा, अवघ्या मूठभर मावळयांना घेऊन आपले स्वराज्य निर्माण केले आणि ते टिकवले. गनिमी कावा करत शत्रूंना पाणी पाजले आणि समाजातल्या प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळवून दिला. एकेकाळी हिंदुस्थानात परकीयांचे राज्य होते.sudarshan shinde गुलामगिरी होती, मुघल आपल्यावर अत्याचार करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार शौर्य, स्वाभिमान, आणि रयतेच्या कल्याणावर आधारित असल्याने युवकांनी बोध घ्यावा.