मुंबई
Arijit Singh retirement, लोकप्रिय गायक अरिजीत सिंग यांनी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम आणि नाराजीदरम्यान त्यांनी अखेर एक भावनिक संदेश शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. २७ जानेवारी रोजी अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांचे मन दुखावले होते. कारकिर्दीच्या शिखरावर असताना घेतलेल्या या निर्णयामागचे कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते.
मात्र २४ फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये अरिजीत यांनी स्पष्ट केले की, त्यांनी जरी नवे प्रोजेक्ट स्वीकारणे थांबवले असले तरी त्यांच्या अनेक गाण्यांचे प्रकल्प अद्याप प्रलंबित आहेत. ही गाणी टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत राहतील आणि कदाचित पुढील वर्षापर्यंतही चाहत्यांना त्यांचा आवाज ऐकायला मिळेल.“हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर कृपया हे वाचू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केली. पुढे त्यांनी चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत लिहिले की, “या निर्दयी आणि स्वार्थी जगात तुमच्या प्रेमासाठी आणि नम्रतेसाठी मनःपूर्वक आभार. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.” त्यांनी स्पष्ट केले की, अनेक अधुरी गाणी पूर्ण होताच प्रदर्शित केली जातील. चाहत्यांनी वारंवार स्पष्टीकरण मागण्यात वेळ घालवू नये, तसेच सोशल मीडियापासून थोडे दूर राहून आरोग्याची काळजी घ्यावी, वाचन, ध्यान आणि प्रेम यांना प्राधान्य द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. पोस्टच्या शेवटी त्यांनी “जय देवी” असा उल्लेख केला.
यानंतर त्यांनी Arijit Singh retirement, आणखी एक ट्विट करत “आणि मग पुढे काय होईल कोण जाणे?” असे गूढ विधान केले, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.अरिजीत यांनी यापूर्वी Instagram वर पोस्ट शेअर करत प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतेही नवे असाइनमेंट स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते. “हा प्रवास इथेच थांबवत आहे. हा प्रवास अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय राहिला आहे,” असे त्यांनी म्हटले होते. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
दरम्यान, मनोरंजनविश्वात Arijit Singh retirement, इतरही घडामोडी घडत असून ‘The Kerala Story 2’ चा टीझर चर्चेत आल्यानंतर तो डिलीट करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. तसेच ‘कांतारा’ चित्रपटाशी संबंधित वादात अभिनेता रणवीर सिंह यांना न्यायालयाने फटकारल्याची बातमीही समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर अरिजीत सिंग यांच्या नव्या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवृत्तीची घोषणा जरी कायम असली, तरी आगामी काळात त्यांच्या नव्या गाण्यांचा सुरेल प्रवास सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चाहत्यांची निराशा काही अंशी कमी झाली असून, त्यांच्या पुढील प्रवासाबाबत उत्सुकता कायम आहे.