तृतीयपंथ्यांकडून बाळाचे अपहरण करण्याचा प्रयत्न

25 Feb 2026 20:13:06
अनिल कांबळे
नागपूर,
attempted-kidnapping : चार तृतीयपंथीयांकडून दिवसाढवळ्या घरात शिरून चार महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. सर्व आराेपी पश्चिम बंगालमधील आहेत. बाळाच्या आईने सतर्कता दाखविल्यामुळे त्याला त्यांच्या तावडीतून साेडविण्यात यश आले. तसेच, तिच्या भावाने तत्परता दाखवत त्यांना पकडले व पाेलिसांच्या हवाली केले. जरीपटका पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे.
 
 
 
jlk
 
 
 
माेहलदुल मीजेद्दीन मलिक (26, कलकीताेला, चाेवीस परगना, पश्चिम बंगाल), सबुरली ईरान अली गाईन (45, आठुरगाकी, चाेवीस परगान, पश्चिम बंगाल), कुरबान अली खान उफर् अमीर अली खान (25, नारायणपूर, भांगूर, पश्चिम बंगाल) व शरबुद्दीन शेख उफर् जाेरअली शेख (20, सातनंबूर, चाेवीस परगना, पश्चिम बंगाल) अशी आराेपींची नावे आहेत. जरीपटका पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार महिलेचे कुटुंबीय राहतात. तिला चार महिन्यांचा मुलगा आहे. साेमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ती महिला नमाज अदा करत हाेती. त्यावेळी तिचा माेठा मुलगा व बाळ घरातच हाेते. अचानक साडी घातलेले चारही आराेपी कुठलाही आवाज न करता घरात शिरले व त्यांनी चार महिन्यांच्या चिमुकल्याला उचलले. ते पाहून बाळाच्या आईने धाव घेतली व एका आराेपीला जाेरदार धक्का दिला, तेव्हा त्याने बाळाला खाली टाकले व सर्व आराेपी पसार झाले. हा प्रकार तिने तिच्या भावाला सांगितला. तिच्या भावाने आजूबाजूच्या परिसरात शाेध घेतला व गुरुद्वाराजवळ त्यांना पकडले. त्याने त्यांना जरीपटका पाेलिस ठाण्याच्या हवाली केले. पाेलिसांनी बाळाच्या आईच्या तक्रारीवरून चारही आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0