कॅन्सर लसीकरणात सहकार्य करणार्‍यांचा सत्कार

25 Feb 2026 19:48:20
वर्धा, 
cancer-vaccination : मॅनकाईंड फार्मा व स्वास्थ वृक्ष फाउंडेशनच्या संयुत वतीने तसेच खा. अमर काळे यांच्या पुढाकाराने समुद्रपूर तालुयातील १२ गावांत कॅन्सरमुत लसीकरण अभियान राबविण्यात आले. अभियानांतर्गत तालुयातील किन्ही, कवठा, निंभा, आरंभा, करुड, पवनगाव व नारायणपूर या सात गावात १०० टके लसीकरण करून ही गावे संपूर्णत: कॅन्सरमुत करण्यात आले. त्यामुळे भारतातील पहिले सर्वायकल कॅन्सर संरक्षित गावे घोषित करण्यात आले असून लसीकरण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सरपंच, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी व स्वास्थ वृक्ष फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचा आज बुधवार २५ रोजी सत्कार करण्यात आला.
 
 
 
l;
 
 
 
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्पप्नील बेले, मॅनकाईंड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल अरोरा, कंपनी दायित्व निधीचे महाव्यवस्थापक अखिलेश डीमरी, स्वास्थ वृक्ष फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. दिपीका चांढोक, उपाध्यक्ष अभिषेक चावला, इंद्रेश चव्हाण, अलोक पांडे उपस्थित होते.
 
 
समुद्रपूर तालुयातील ७ गावे देशातील पहिली कॅन्सरमुत गावे घोषित करण्यात आली आहे. यासाठी आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, गावांचे सरपंच व नागरिकांनी आलेल्या विविध अडचणींवर मात करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केल्याबाबत खा. अमर काळे यांनी यावेळी आभार मानले. पुढील टप्प्यात संपूर्ण समुद्रपूर तालुका कॅन्सरमुत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0