सिमेंट काँक्रीट राेडच्या समस्येवर कालबध्द कार्यक्रम द्या

25 Feb 2026 21:27:35
अनिल कांबळे
नागपूर, 
cement-concrete-road : शहरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते उंच झाले असून त्यामुळे पाणी साचते, ही समस्या कशी साेडवाल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करीत यासंदर्भात येत्या 9 मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम सादर करा, असे आदेश महापालिका आणि अन्य प्रतिवादींना दिलेत. याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्या. राज वाकाेडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
 
 
fk
 
शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या बांधकामाविराेधात जनमंच या संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत नमूद केल्यानुसार, शहरातील नागरिकांनी सिमेंट रस्त्यांबाबत चिंता व्यक्त केली हाेती आणि त्याचे छायाचित्रण करून जनमंचला माहिती दिली हाेती. जनमंचने दाखल केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाने प्रतिवादींना (नागपूर महानगरपालिका आणि इतर संबंधित विभाग) शहरातील सुरू असलेल्या सिमेंट रस्ते बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली हाेती. बांधकामादरम्यान याेग्यरित्या पाण्याचा निचरा, मलनिस्सारण वाहिन्या, विद्युत केबल्स, जल पुनर्भरण केंद्र आणि पाणीपुरवठा व्यवस्था यासारख्या आवश्यक सुविधांची खात्री करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने एप्रिल 2025 मध्ये प्रतिवादींना नाेटीस बजावली हाेती. याचिकाकर्त्यार्ते अ‍ॅड. परवेझ मिर्झा यांनी बाजू मांडली.
Powered By Sangraha 9.0