तभा वृत्तसेवा
दिग्रस,
digras-kalidoult-unseasonal-rain : तालुक्यात वादळी वाèयासह कोसळलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकèयांच्या तोंडाशी आलेल्या रबी पिकांचे चांगलेच नुकसान झाले.
तालुक्यातील रामनगर, लिंबा, विठोली, विठाळा, वसंतनगर, कलगाव, डेहणी, रुई, पेळू , राहटी, इसापूर व तुपटाकळी आदी गावांतील शेतात उभे असलेले गहू व हरभèयाचे पीक जोरदार वाèयामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले. कापणीच्या उंबरठ्यावर आलेले सोनेरी गव्हाचे शेत क्षणात जमीनदोस्त झाले. तर दाणेदार हरभèयाची झाडे वाèयाने आडवी पडली.
शेतकèयांच्या अनेक महिन्यांच्या कष्टांवर अवकाळीचा मारा झाला असून मोठ्या आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. फळबागांनाही या अवकाळी संकटाचा मोठा फटका बसला आहे. संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी व पपईच्या बागांतील फळांची गळती झाली आहे.
परिसरातील आंब्याच्या झाडांवरील बहरलेला मोहरही गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. त्यामुळे आगामी हंगामातील उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रामनगर शिवारातील शेतकरी सचिन पद्मावार, विठाळा शिवारातील कैलास चव्हाण यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकèयांच्या शेतांतील गहू व हरभरा जमीनदोस्त झाले असून त्यांच्यासारख्या अनेक शेतकèयांचे मोठे नुकसान झाले आहे.
‘हाती आलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले’ अशी हळहळ शेतकèयांकडून व्यक्त होत आहे. या नैसर्गिक आपत्तीची शासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे करावे, नुकसानग्रस्त शेतकèयांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकèयांकडून होत आहे.
रविवारी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाèयासह अवकाळी पावसाने महागाव तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सुमारे दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतकèयांच्या हाती आलेले पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकèयांकडून करण्यात येत आहे.
या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा तसेच कापून ठेवलेल्या तुरीच्या गंजींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने पीक भिजून जमीनदोस्त झाले. हरभèयालाही मोठा फटका बसला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सोसाट्याच्या वाèयासह विजेच्या कडकडाटामुळे शेतशिवारात मोठी हानी झाली. वीजपुरवठाही खंडित झाला. आंबा, टरबूज, काकडी तसेच भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकèयांनी सांगितले.
शेतकèयांच्या म्हणण्यानुसार, गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन खर्चात वाढ झाली असून अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कास्तकारांचे नुकसान अधिकच वाढले आहे. महसूल प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नसल्याने शेतकèयांमध्ये नाराजी आहे. महसूल विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकèयांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकèयांकडून करण्यात येत आहे.