डोंबिवली आयरेगावात पाणीटंचाई 'स्मार्ट सिटी'चे दावे धुकेबाज

25 Feb 2026 12:37:05
डोंबिवली,
Dombivli water shortage डोंबिवली शहरातील आयरेगाव परिसरातील टावरी पाड्यात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी खाजगी रिक्षा, सायकल किंवा इतर मार्गांचा वापर करून तब्बल २०० रुपये खर्च करावे लागत असल्याचे समोर आले आहे. या तगदीने नागरिकांचे मासिक बजेट कोलमडले असून, त्यांच्यात नगरपालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 

Dombivli water shortage 
सकाळी कामावर निघण्याआधी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पाण्यासाठी रांगा लावल्याचे पाहायला मिळते. अनेक कुटुंबांना घरगुती गरजांसाठी पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचा असा आरोप आहे की, डोंबिवली स्मार्ट सिटी म्हणून घोषित झाले असले तरी मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी काही भागात तातडीच्या अडचणींमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, नवीन जलकुंभ उभारणे आणि अंतर्गत जलवाहिन्यांचे काम हाती घेतले असून, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. मात्र, अनधिकृत चाळींना पाणी मिळत असताना अधिकृत इमारतींना नियमानुसार पाणी न मिळाल्यामुळे समस्या अधिक तीव्र झाली आहे.
२००५ ते २०१५ दरम्यान Dombivli water shortage आयरेगाव भागात केवळ दीड लाख लिटर क्षमतेची टाकी होती. नगरसेवकांचे म्हणणे आहे की, आता १५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार केला गेला आहे आणि १६५० अधिकृत पाणी कनेक्शन बसवण्यात आले आहेत. अलीकडे सहा इंचाची नवीन जलवाहिनीही टाकण्यात आली असून, अंतर्गत नेटवर्क सुधारल्यास पाणी समस्या लवकरच दूर होईल, असे त्यांनी आश्वासन दिले.सध्या नागरिकांची मागणी आहे की, फक्त आश्वासन न देता तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाव्यात. स्मार्ट सिटीचे दावे धुकेबाज ठरत असल्याने, मूलभूत सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी स्थानिकांची भावना व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0